एक्स्प्लोर

सीएसएमटी पुलाचा ऑडिटर नीरज देसाईच्या जामीनाला विरोध, मुंबई पोलिसांचं प्रतिज्ञापत्र सादर

'जर स्ट्रक्‍चरल ऑडिट गंभीरपणे झाले असते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील हिमालय पूल कोसळला नसता', असा दावा करत मुंबई पोलिसांनी पुलाचे ऑडिट करणाऱ्या ऑडिटर नीरज देसाईच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे.

मुंबई : 'जर स्ट्रक्‍चरल ऑडिट गंभीरपणे झाले असते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील हिमालय पूल कोसळला नसता', असा दावा करत मुंबई पोलिसांनी पुलाचे ऑडिट करणाऱ्या ऑडिटर नीरज देसाईच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे. सीएसएमटी पूल दुर्घटनाप्रकरणी नुकतेच आरोपपत्र दाखल झाले आहे. ऑडिटर नीरज देसाईने जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणी कोर्टाने 20 मेपर्यंत तहकूब केली आहे. पुलाचे ऑडिट नीरज देसाई संचालक असलेल्या कंपनीच्यावतीने करण्यात आले होते. कंपनीने डिसेंबर 2016 मध्ये पुलाच्या अवस्थेबाबत आपला अहवाल दिला होता. पुलाच्या दुरुस्तीचे काम हे महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार सुरु असते. "पुलावर नव्याने बसवण्यात आलेल्या ग्रॅनाईटमुळे या बांधकामाला धोका निर्माण झाला", असा दावा देसाईने जामीन अर्जात केला आहे. परंतु पुलाची अवस्था पडझडीची झाली असूनही देसाई यांनी जाणीवपूर्वक पुलाच्या वापरासाठी परवानगी दिली होती, असा आरोप पोलिसांच्यावतीने करण्यात आला आहे. नीरज देसाई मेकॅनिकल इंजिनिअर असून स्ट्रक्‍चरल ऑडिटच्या कामाची त्यांना माहिती आहे. अशाप्रकारची ऑडिट फार महत्वाची असतात आणि त्यात जर काही चूक झाली तर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ती कशापद्धतीने करायला हवी, याचीदेखील त्यांना जाणीव आहे. परंतु असे असतानाही त्यांनी ज्याप्रकारे या पुलाचे ऑडिट केले ते निष्काळजीपणाचे आणि गांभीर्य नसलेले आहे. या कामासाठी त्यांनी सरकारी निधी वापरला, तरीही पूल कोसळून त्यामध्ये जिवितहानी झाली. जर त्यांनी हे काम योग्य पद्धतीने केले असते तर ही दुर्घटना घडली नसती, असा आरोप पोलिसांनी केला आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच 33 जण गंभीर जखमी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget