एक्स्प्लोर
मनसेच्या मोर्चाच्या अपेक्षित मार्गाला मुंबई पोलिसांचा रेड सिग्नल
पाकिस्तान, बांगलादेशमधून भारतात घुसखोरी करणाऱ्यांविरोधात मनसेने आंदोलन पुकारलं आहे. मुंबईत 9 फेब्रुवारीला आझाद मैदानावर मनसे मोर्चा काढणार आहे. मनसेचा नियोजित मोर्चा भायखळा ते आझाद मैदान असा निघणार होता.
![मनसेच्या मोर्चाच्या अपेक्षित मार्गाला मुंबई पोलिसांचा रेड सिग्नल Mumbai Police gives red signal to MNS march route मनसेच्या मोर्चाच्या अपेक्षित मार्गाला मुंबई पोलिसांचा रेड सिग्नल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/22090322/Raj-Thackeray1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राष्ट्रीय नागरित्व नोंदणी अर्थात एनआरसीच्या समर्थनार्थ मनसेच्या मोर्चाच्या अपेक्षित मार्गाला मुंबई पोलिसांनी रेड सिग्नल दाखवला आहे. भायखळा ते आझाद मैदान या मार्गाऐवजी मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान या मार्गाचा वापर करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. येत्या रविवारी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी एनआरसीच्या समर्थनार्थ मनसे मोर्चा काढणार आहे.
मनसेने जिजामाता ते आझाद मैदान या मार्गावरुन मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती. मात्र इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मोर्चाचा विरोध म्हणून हा मोर्चा काढला जात आहे. सीएए आणि एनआरसीविरोधातील भावना या परिसरातील नागरिकांच्या मनात जास्त आहे. हा मुस्लीमबहुल परिसर आहे. इथून हा मोर्चा निघाला तर अनुचित प्रकार घडू शकतो. या कारणामुळेच पोलिसांनी हा मनसेला हा मार्ग नाकारला आहे.
पोलिसांनी मनसेला मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान हा पर्यायी मार्ग सुचवला आहे. रझा अकादमीविरोधातील मनसेचा मोर्चाही मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान असाच होता. हाच मार्ग वापरावा, अशी सूचना पोलिसांनी मनसेला केली आहे. यासंदर्भात आता मनसेचे नेते पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे हा मार्ग वापरेल. तसंच या मोर्चाची सुरुवात हिंदू जिमखाना इथून होईल. त्यानंतर पक्ष पोलिसांना माहिती देईल.
अधिवेशानात मोर्चाची माहिती
मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात बोलाताना राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, "देशातील घुसखोरांना हुसकावून लावण्यास केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात जे मोर्चे काढले जात आहेत, तो संशोधनाचा विषय आहे. मात्र मोर्चांना मोर्चानेच उत्तर दिलं पाहिजे. त्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहे.
संबंधित बातम्या
- सीएएला विरोध मात्र एनआरसीचं समर्थन, मनसेची भूमिका बाळा नांदगावकरांकडून स्पष्ट
- तुमचा धर्म तुमच्या घरात आचरणात आणा, मशिदींवरचे भोंगे कशाला हवेत?, राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा सूर
- मी रंग बदलून सरकारमध्ये जाणारा नाही, नाव न घेता राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- आर्थिक मंदीवरुन देशाचं लक्ष हटवण्यासाठी अमित शाहांची CAA ची खेळी यशस्वी : राज ठाकरे
- Raj Thackeray | माझा मूळ डीएनए नव्या झेंड्याच्या रंगाचाच : राज ठाकरे
- मला 'हिंदुहृदयसम्राट' म्हणू नका : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)