एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मला 'हिंदुहृदयसम्राट' म्हणू नका : राज ठाकरे
एनआरसीच्या समर्थनासाठी नऊ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज यांनी मनसे नेत्यांना दोन महत्वाच्या सूचना दिल्या होत्या.
मुंबई : हिंदुहृदयसम्राट हा मान बाळासाहेबांचा आहे, त्यामुळे मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना दिली आहे. एनआरसीच्या समर्थनासाठी मनसे नऊ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढणार आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची वांद्र्यातील रंगशारदा इथे बैठक बोलावली होती. त्यात फक्त 10 मिनिटांची उपस्थिती लावून राज ठाकरे बाहेर पडले. या दहा मिनिटांत त्यांनी मनसेच्या नेत्यांना दोन महत्वाच्या सूचना दिल्यात.
मुंबईतील गोरेगाव इथे 23 जानेवारीला झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसीच्या समर्थनासाठी मनसे नऊ फेब्रुवारीला मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यासाठी राज ठाकरेंनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची वांद्र्यातील रंगशारदा इथे सकाळी 10 वाजता बैठक बोलावली होती. राज ठाकरे साडेबाराच्या सुमारास रंगशारदा सभागृहात पोहोचले आणि त्यानंतर बैठकीत फक्त दहा मिनिटांची उपस्थिती लावून राज ठाकरे बाहेर पडले. थ्रोट इन्फेक्शनमुळे राज ठाकरे बैठकीत उशिरा सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे.
हिंदुहृदयसम्राट हा मान बाळासाहेबांचा -
या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांना दोन महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. एक म्हणजे मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका. कारण, तो मान बाळासाहेबांचा असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरं म्हणजे पक्षाच्या झेंड्याचा मान राखा. कारण, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. येत्या 9 फेब्रुवारीला एनआरसी समर्थनासाठी मोर्चा काढण्याची घोषणा राज यांनी केली आहे. त्याच्या तयारीसाठी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
NRC च्या समर्थनात 9 फेब्रुवारीला मोर्चा -
राज्यव्यापी अधिवेशनात हिंदुत्त्वाचा पुरस्कार करत मनसे भगवीमय केल्यानंतर, राज ठाकरेंनी त्यांचा मोर्चा पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या घुसखोरांविरोधात वळवला आहे. यासाठीच एनआरसी कायद्याला विरोध करणाऱ्यांविरोधात मनसे 9 फेब्रुवारीला विराट मोर्चा काढणार आहे. यावेळी एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर यांचा नामोल्लेख करत देशप्रेमी मुस्लीम आपलेच असल्याचंही राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray | एनआरसी समर्थनासाठीची मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक केवळ दहा मिनिटात आटोपली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement