एक्स्प्लोर

POCSO Act : मुंबई पोलीस आयुक्तांनी पॉक्सोशी संबंधित आदेश मागे घेतला!

POCSO Act : मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पॉक्सो कायद्याशी संबंधित आदेश मागे घेतला आहे. अनेक लोक जाणूनबुजून पॉस्कोचे गुन्हे नोंदवत असल्याचा संशय व्यक्त करत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पॉक्सोशी संबंधित आदेश जारी केला होता.

POCSO Act : मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Mumbai CP Vivek Phansalkar) यांनी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात पॉक्सो (POCSO) कायद्याशी संबंधित आदेश मागे घेतला आहे. अनेक लोक जाणूनबुजून पॉस्कोचे गुन्हे नोंदवत असल्याचा संशय व्यक्त करत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी पॉक्सोशी संबंधित आदेश जारी केला होता. परंतु विवेक फणसाळकर यांनी हा आदेश तात्काळ मागे घेण्यास सांगितलं आहे. पॉक्सो अंतर्गत गुन्हा ही गंभीर बाब आहे, त्याची तात्काळ नोंद करुन तपास सुरु करावा, असं फणसाळकर यांनी सांगितलं.

संजय पांडे यांनी जारी केलेला आदेश काय होता?
माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मागील महिन्यात 6 जून रोजी पॉक्सो संदर्भात मोठा निर्णय घेतला होता. यापुढे पॉक्सो किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. POCSO चा होणाऱ्या गैरवापरामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. "जुन्या वादातून, मालमत्तेच्या वादातून किंवा अन्य कोणत्याही वैमनस्यातून पोलिस ठाण्यात पॉक्सो किंवा विनयभंगाच्या तक्रारी दाखल होत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत अनेकवेळा आरोपी निर्दोष ठरतो, मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि त्याची बदनामीही होते. प्रथम एसीपी प्रथम अशा कोणत्याही तक्रारीची चौकशी करतील आणि नंतर अंतिम आदेश डीसीपी देतील, त्यानंतर गुन्हा दाखल करा," असं या आदेशात म्हटलं होतं.

परंतु मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी हा आदेश मागे घेतला आहे. पॉक्सो अंतर्गत गुन्हा ही गंभीर बाब असून पॉक्सो अंतर्गत तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी करुन तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत.

पॉक्सो कायदा म्हणजे काय?
पॉक्सो कायदा (POCSO ACT) म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने 2012 साली तयार केलेला कायदा आहे. लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 07 January 2025Pune Health Officer on HMPV : HMPV कोरोना व्हायरससारखा नाही, सामान्य माणसाने काय काळजी घ्यावी?Pankaja Munde Speech : अजित पवार,फडणवीस बीडमधील राजकीय पर्यावरण सुधारू शकतीलDhananjay Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणाला जातीय रंग देऊ नका, धनंजय देशमुखांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
Embed widget