जबराट कामगिरी करणाऱ्या तब्बल 220 पोलिसांचा सन्मान, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते गौरव
Mumbai Police : पोलिसांनी गुन्ह्यांचे डिटेक्शन करून आरोपीला शिक्षा मिळावी त्यासाठी प्रमाण वाढवावे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्थिती अभिमन्यूसारखी - पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर
Mumbai Police : जगातील सर्वोत्तम पोलीस यंत्रणा असलेल्या स्कॉटलँड पोलिसांनंतर मुंबई पोलिसांचं नाव घेतलं जातं. मुंबई पोलिसांनी नेहमीच मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाचं रान केले आहे. मात्र मुंबई पोलिसांनी आपल्या कामात सातत्य ठेवणं गरजेचं असल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर त्यांनी म्हटले आहे. मुंबईतील 70 ते 80 टक्के गुन्हे उघडकीस येतात. यापैकी कन्वेक्शन फक्त 20 टक्के आहे, यात पोलिसांनी सातत्य राखून कामगिरी सुधारली पाहिजे अशी आशा फणसाळकर यांनी व्यक्त केली आहे. ते मुंबईच्या गोरेगाव येथील मेस्को संकुलात आयोजित परिमंडळ 8,11 आणि 12 मधील सत्र न्यायालयाने दोष सिद्धी झालेल्या गुन्ह्यातील अधिकारी आणि अंमलदार यांच्या गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.
मुंबई पोलीस परिमंडळ 8, 11 आणि 12 मधील तब्बल 220 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ आज मुंबईच्या नेस्को संकुलात पार पडला. सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्यापासून आरोपी दोषी सिद्ध करून शिक्षा होईपर्यंत या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्यांच्या कार्याचा गौरव मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमास विशेष आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, मा. अपर पोलीस पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग राजीव जैन, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-८ दिक्षित गेडाम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ११ अजय कुमार बंसल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- 12 स्मिता पाटील, गौरव करण्यात आलेले पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
पोलीस खात्यातील अधिकारी आणि अंमलदार यांची स्थिती ही अभिमन्यू सारखी असते.म्हणजे सगळीकडून पोलीस घेरलेले असतात. कारवाई होत नाही किंवा कारवाई वेळेवर होत नाही झाली तर जास्त होत नाही म्हणून तक्रारदार पोलिसांवर नाखूष असतो.कारवाई झाली म्हणून आरोपी नाखुश असतो. तुम्हाला कळतंय म्हणून आम्हाला कळलं पाहिजे म्हणून पत्रकार देखील नाखूष असतात.विरोधकांचे वकील देखील नाराज असतात. या सर्वांच्या नाराजीला सामोरे जात असताना पोलिसांनी खचून न जाता आपल्या कामात सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे मत पोलीस आयुक्त यांनी व्यक्त केले.
पोलिस म्हणजे पी फॉर पोलीस हा जो आहे, तो पी फॉर प्रेस, पी फॉर पब्लिक, पी फॉर पॉलिटिशियन अशा चार-पाच पी ने घेरलेला असतो, त्यामुळे बऱ्याच वेळा आपली कामगिरी चांगली होऊन देखील आपण स्वतःबद्दल साशंक असतो. आपण केलेलं बरोबर केलं की नाही योग्य केलं की नाही त्याच्यानंतर आपण जे केलंय ते शेवटपर्यंत पाहिला अनेक्जण नसतात.डिटेक्शन झालं रिवार्ड झालं सॅल्यूट बिल्युट झालं त्यानंतर त्या केसचं काय झालं ते अनेकांना माहीत नसतं. गुन्ह्यांचे डिटेक्शन पर्सेंटेज 70 ते 80 टक्के म्हणजे शंभरात ऐंशी झालं तर त्यापैकी कन्वेक्शन परसेंटेज 20 म्हणजे टोटल परसेंटेज 16 झालं म्हणजे 16% आणि या 16% जी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी आहे ज्याच्यामुळे हा समाज सुस्थितीत राहतो आश्वस्त राहतो. समाजाविरुद्ध जर गुन्हा झाला तर त्या गुन्हेगाराला शिक्षा होईल आणि गुन्हेगाराला शिक्षा झाली तर समाज स्वास्थ्य राहतो म्हणून पोलिसांनी कामात सातत्य ठेवून जनतेचा आपल्यावरील विश्वास टिकवला पाहिजे असेही फणसाळकर यांनी म्हटले आहे.
एखाद्या आरोपीला शिक्षा झाली ते पोलिसांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते शिक्षा झाली हे सर्वांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे जे आरोपी असतात किंवा जे होऊ घातलेले आरोपी असतात त्यांना निश्चितच पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरी मुळे चाप बसतो म्हणून अशा सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होणे फार गरजेचा आहे कौतुक करणे गरजेचे आहे.