हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांना ड्रग्ज पुरवणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून रोज बॉलिवूडमधील वेगवेगळ्या कलाकारांची चौकशी केली जात आहे. अशातच आता हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांना ड्रग्ज पुरवणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : सुशांतसिंग मृत्यू प्रकरणानंतर तपासात हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार हे अंमली पदार्थ सेवन करत असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 ने हिंदी चित्रपट सृष्टीतील काही जणांना अंमली पदार्थ पुरवत असलेल्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 139 ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एमडी जप्त केले आहे. याचं बाजारमूल्य साडेपाच लाख रुपये आहे.
उस्मान अन्वर अली शेख (वय 40), असं या आरोपीचं नाव असून तो जोगेश्वरी पश्चिम येथे राहतो. अंमली पदार्थ विकण्याचा याचा धंदा आहे. चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार अंमली पदार्थ सेवन करत असल्यावरून देशभरात चर्चा सुरू आहे. त्यांची चौकशी होत आहे. त्यांनाही हा उस्मान शेख अंमली पदार्थ पुरवत असल्याचे पोलीस चौकशीत समोर आल्याची माहिती गुन्हे शाखा विभागाचे पोलीस आयुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे.
ड्रग्जसंदर्भात चॅट केलं मात्र ड्रग्ज घेतलं नाही, चौकशीदरम्यान दीपिकाचा कबुली
उस्मान हा झोमॅटो या हॉटेल मधील खाद्यपदार्थ घरपोच पुरवणाऱ्या कंपनीत काम करतो आणि त्याच्या आडून ग्राहकांना अंमली पदार्थ पुरवतो. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांना आपल्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम उपनगरातील जोगेश्वरीच्या ओशिवरा या ठिकाणी असलेल्या एका मॉलजवळ उस्मान हा मेफेड्रोन म्हणजेच एमडी हा अंमली पदार्थ विकण्यासाठी मोटारसायकल घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी उस्मान अन्वर अली शेख याला 139 ग्रॅम इतक्या वजनाचे ज्याची बाजारातील किमंत साडे पाच लाख रुपये आहे, याला रंगेहात पकडलं.
आरोपीला आपल्या कार्यालयात आणून चौकशी केली असता त्याला अबू सुफियान खान हा एमडी पुरवत असल्याचं त्यानं सांगितलं. तसेच तो चित्रपट सृष्टितील काही बड्या हस्तींनाही अंमली पदार्थ पुरवत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या दोघांची याबाबत त्या दिशेने चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे. उस्मान आणि अबू सुफियान यांची कसून चौकशी पोलिसांनी केली. तर सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारेल आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील बडे कलाकार गळाला लागतील हे निश्चित.
Bollywood drug probe | ड्रग्जसंदर्भात चॅट केलं मात्र ड्रग्ज घेतलं नाही, चौकशीदरम्यान दीपिकाचा कबुली