एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पेपरवाला ते कोट्यधीश, सुनिल शितपचा 'सिनेमॅटिक' प्रवास
एक काळ असा होता की सुनील शितपच्या घरात दोन वेळ चूल पेटेल याची शाश्वती नसायची. पत्नीच्या मदतीनं फुलांचे हार विकण्याचा व्यवसाय सुरु केला. मात्र त्यातही भागत नसल्यामुळे त्यानं घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याचं काम सुरु केलं.
मुंबई : घाटकोपरमधल्या साईदर्शन इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचं होत्याचं नव्हतं झालं. इमारतीचे पिलर हटवल्यानं आरोपी सुनिल शितपनं 17 जणांचे जीव घेतले. सुनील शितपचा आतापर्यंतचा प्रवास एका सिनेमासारखाच आहे. एक पेपरवाला कसा कोट्यधीश झाला, हा प्रवास रंजक आहे.
मुंबईच्या घाटकोपरमधल्या झोपडपट्टीमध्ये सुनील शितप लहानाचा मोठा झाला. इथल्या गणपती मंदिराजवळच्या घरात त्याचं कुटुंब राहायचं. एक काळ असा होता की सुनील शितपच्या घरात दोन वेळ चूल पेटेल याची शाश्वती नसायची.
घर चालवण्यासाठी सुनीलनं पत्नीच्या मदतीनं फुलांचे हार विकण्याचा व्यवसाय सुरु केला. मात्र त्यातही भागत
नसल्यामुळे त्यानं घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याचं काम सुरु केलं.
दरम्यानच्या गाळात सुनील शितपचे पाय राजकारणाकडे वळले. राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना सुनील शितपनं केबलमाफियांशी हातमिळवणी केली. अल्पावधीत त्यानं स्वतः केबल नेटवर्कवर कब्जा मिळवला आणि पेपर टाकणारा सुनील शितप कोट्यधीश झाला.
केबलच्या धंद्यात पाय रोवल्यानंतर शितप लहान-मोठ्या मुंबईमहापालिका अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला. त्यांनी शितपला भूमाफिया बनण्याचा मार्ग दाखवला.
खाबू पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीनं सुनील शितपनं भूखंड, झोपडपट्ट्या बळकवायला सुरुवात केली. अशा संपत्ती दुप्पट दामानं विकून शितपनं चांगलीच माया जमवली. पवईमधलं रुमर्स लाँज, हे शितपच्या बेकायदा बांधकामाचं जिवंत उदाहरण म्हणायला हवं.
सुनील शितपचं घाटकोपरच्या एलबीएस रोडवर एक रेस्टॉरन्ट, 1 ऑफिस, 3 फ्लॅट्स आणि मालाडमध्ये देखील भूखंड आणि घर असल्याची माहिती मिळते.
2012 मध्ये सुनील शितपनं मनसेच्या तिकीटावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली. मनसेला सोडचिठ्ठी
दिल्यानंतर त्यानं हातावर शिवबंधन बांधलं. 2017 मध्ये शितपची पत्नी आशा यांनी शिवसेनेच्या तिकीटावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली.
शितपनं 2008 मध्ये साईदर्शनमधली जागा एस. दामले नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतली होती. त्या व्यवहाराचे संपूर्ण पैसे अद्याप मिळाले नसल्याचं दामलेंनी सांगितलं.
राजकारणी आणि मुंबई महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांच्या जीवावर पेपर टाकणारा सुनील शितप भूमाफिया आणि कोट्यधीश बनला, त्यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न सर्वांना सतावतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement