शाळांकडून शालेय शुल्क भरण्यासाठी होत असलेल्या जबरदस्ती विरोधात आझाद मैदानात राज्यभरातील पालकांचे आंदोलन
दुसऱ्या टर्मची फी न भरल्यामुळे अनेक शाळांनी अनेक मुलांचे ऑनलाईन शिक्षणही बंद केलं आहे. त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून अशा शाळांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
![शाळांकडून शालेय शुल्क भरण्यासाठी होत असलेल्या जबरदस्ती विरोधात आझाद मैदानात राज्यभरातील पालकांचे आंदोलन Mumbai News Statewide parents organized protest azad maidan over issues concerning school fees of private शाळांकडून शालेय शुल्क भरण्यासाठी होत असलेल्या जबरदस्ती विरोधात आझाद मैदानात राज्यभरातील पालकांचे आंदोलन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/17185458/teacher.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील आझाद मैदानात शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या आवाजवी शालेय शुल्क विरोधात राज्यभरातील पालकांनी एकत्र येऊन आंदोलन केलं. या पालकांचं म्हणणं आहे की, शाळांनी आपल्या मुलांना काढून टाकण्याच्या सतत धमकी दिल्यामुळे सर्व पालक तणावग्रस्त आहेत. जर शालेय शुल्क भरले नाही तर मुलांना ऑनलाइन क्लासमध्ये बसू दिले जाणार नाही. अशा पद्धतीच्या धमक्या वारंवार येत आहेत धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या टर्मची फी न भरल्यामुळे अनेक शाळांनी अनेक मुलांचे ऑनलाईन शिक्षणही बंद केलं आहे त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून अशा शाळांवर कडक कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी 'फोरम फॉर फेअरनेस एज्युकेशन' या संघटनेने केली आहे.
याबाबत बोलताना या संघटनेचे प्रमुख जयंत जैन म्हणाले की, मागील तीन महिन्यापासून विनाअनुदानित खाजगी शाळांचे पालक त्यांच्याकडून शाळांनी आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शालेय शुल्क विरोधात आंदोलने करत आहेत. याबाबत अनेक तक्रारी देखील शासनाकडे केल्या आहेत. परंतु तरीदेखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पालक भरत असलेल्या शालेय शुल्कचा निर्णय मागील वर्षी सामान्य शालेय शिक्षणासाठी घेण्यात आला होता. मार्च 2020 पासून टाळेबंदी झाल्यामुळे जानेवारी 2021 पर्यंत कोणत्याही शाळा कार्यान्वित नव्हत्या. तरीदेखील राज्यभरातील अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांचे पूर्ण शुल्क वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे आमची शासनाकडे विनंती आहे की, शाळांना देखील पालकांकडून त्याच हिशोबाने शुल्क आकारावे. त्यांना कमीत कमी 40 ते 50 टक्के फी दरामध्ये सवलत द्यावी. शाळांनी इतर अवाजवी जे शुल्क आहे ते घेऊ नये यामध्ये बसचे शुल्क, कॅन्टीन शुल्क, ग्रंथालय शुल्क, कॅलेंडर, पुस्तके, गणवेश यासोबतच इतर खेळांच्या ॲक्टिविटी याचेदेखील पैसे घेऊ नयेत. यामुळे पालकांना कुठेतरी शालेय शुल्काच्या त्रासातून सवलत मिळेल जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र आम्ही आमचं हे आंदोलन अधिक तीव्र करू या नंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे तर त्याला जबाबदार असेल. आम्ही वारंवार शालेय शुल्काच्या या समस्येबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या सोबतच शिक्षण विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे आणि त्यांची भेट देखील घेतली आहे. परंतु आज अखेर आम्हाला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया प्रशासनाकडून आलेली नाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की त्यांनी तत्काळ या संपूर्ण विषयात लक्ष घालावं आणि राज्यभरातील सर्वसामान्य पालकांना शैक्षणिक शुल्काच्या जाचातून सवलत द्यावी.
या आंदोलनासाठी आज राज्यभरातून अनेक पालक आंदोलनासाठी आझाद मैदानात दाखल झाले होते. एकीकडे टाळेबंदीत नोकरी गेली त्यामुळे कुटुंब चालवणे मुशिकल झालं आहे तर दुसरीकडे शालेय शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)