Dangerous Buildings List in Mumbai: मुंबईतील 82 इमारती अतिधोकादायक; पावसाळ्यापूर्वी तातडीने इमारती रिकाम्या करा, म्हाडाकडून आवाहन
Dangerous Buildings List in Mumbai: MHADAच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात या इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले.

Dangerous Buildings List in Mumbai: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी महत्त्वाचा इशारा देत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) ने मुंबई शहर विभागातील 82 इमारतींना "अतिधोकादायक" घोषित केले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या इमारतींमधील रहिवाशांनी तातडीने स्थलांतर करावे, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.
MHADAच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात या इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, यापैकी 43 इमारतींना गेल्या वर्षीही धोकादायक घोषित करण्यात आले होते. त्यामुळे जुन्या आणि जीर्ण सेस इमारतींच्या पुनर्विकास व दुरुस्तीचा प्रश्न अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. या 82 इमारतींमध्ये एकूण 2,736 भाडेकरू आणि रहिवासी आहेत. त्यामध्ये 2,256 निवासी तर 480 व्यावसायिक गाळेधारकांचा समावेश आहे.
स्थलांतरास विलंब झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल- (Dangerous Buildings List in Mumbai)
MHADAने आतापर्यंत केलेल्या कारवाईनुसार,176 रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 29 रहिवाशांचे MHADAच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. 36 रहिवाशांनी स्वतःहून अन्यत्र स्थलांतर केले आहे. मात्र, अद्याप 2,100 हून अधिक रहिवाशांचे पुनर्वसन करणे बाकी असून त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे. पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन MHADAने केले असून, स्थलांतरास विलंब झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.
MHADA ने अतिधोकादायक घोषित केलेल्या 82 इमारतींची यादी- (Dangerous Buildings List in Mumbai)
१) ३० C–३० D, बोमनजी लेन
२) १२०, बोरा बाजार स्ट्रीट
३) १५, टंडेल क्रॉस लेन
४) १००–१०२, कांबेकर स्ट्रीट
५) ७१–७७, सॅम्युअल स्ट्रीट
६) इमारत क्र. २३–२७, बनियन स्ट्रीट
७) इमारत क्र. ४०, बापू कोर्ट स्ट्रीट
८) इमारत क्र. ४०४–४१६ क्लस्टर, शेख मेमन स्ट्रीट व लगतचा परिसर
९) इमारत क्र. ४०४-D, कलबादेवी रोड
१०) इमारत क्र. १५७/३, कॅव्हल क्रॉस लेन क्र. ५
११) इमारत क्र. ८३–८५, ट्रिनिटी स्ट्रीट
१२) इमारत क्र. ३७७-A, जे. एस. एस. रोड
१३) इमारत क्र. ७–९, रोपा लेन
१४) इमारत क्र. २५, नवरोजी स्ट्रीट
१५) इमारत क्र. २२–३४, व्ही. पी. रोड
१६) इमारत क्र. ५१, फर्स्ट कारपेंटर स्ट्रीट
१७) ३१A, मामा परमानंद मार्ग, गिरगाव
१८) १६–२२A, खट्टर अली लेन, गिरगाव
१९) ११–१३, एम. के. रोड, गिरगाव
२०) ५D, दुभाष लेन, गिरगाव
२१) ३१६-AB, व्ही. पी. रोड, गिरगाव
२२) २४७-B, व्ही. पी. रोड, गिरगाव
२३) कल्याण बिल्डिंग, गिरगाव
२४) ८८D–८८G, खाडिलकर रोड, गिरगाव
२५) ४१–४५, जे. एस. एस. रोड, गिरगाव
२६) मंचाराम निवास, शेणवी वाडी
२७) विष्णू निवास, शेणवी वाडी
२८) २१–BC, खाडिलकर रोड
२९) इमारत क्र. ३१४-B, व्ही. पी. रोड
३०) इमारत क्र. ५-J, दुभाष लेन
३१) ६६–६८A, तात्या घरपुरे पथ
३२) मातृवंदना, खेतवाडी ६ वी गल्ली
३३) २–८, पावईवाला स्ट्रीट
३४) १, खेतवाडी १२ वी गल्ली
३५) ४२७-E, एम. एस. अली रोड
३६) ३४६–३४८A, बेलासिस रोड
३७) ३, राघवजी रोड
३८) २५, ससेक्स रोड, माझगाव
३९) ८६B, मापलावी मोतीशा लेन
४०) ७–९A, हत्तीबाग रोड
४१) १०, हत्तीबाग रोड
४२) २२, नारळवाडी रोड
४३) उनवाला बिल्डिंग, डी. एन. सिंह रोड
४४) २६, ससेक्स रोड
४५) ७६, टँक बंदर रोड
४६) दिग्विजय मिल चाळ, काळाचौकी
४७) २–१८, बाबुला टँक रोड
४८) जगुली बिल्डिंग, सांकळी स्ट्रीट
४९) गुजरिया बिल्डिंग, मौलाना आझाद रोड
५०) ४४०–४४२, सर जे. जे. रोड
५१) ८५–९७, सोफिया झुबेर रोड क्लस्टर
५२) ६७–८१, सोफिया झुबेर रोड
५३) मौलाना आझाद रोडवरील विविध संरचना
५४) ५०–६४, मौलाना आझाद रोड
५५) ४–६–८, मौलाना आझाद रोड
५६) डिमटिमकर रोड क्लस्टर
५७) १०, मौलाना आझाद रोड
५८) १२–२०, मौलाना आझाद रोड
५९) कामाठीपुरा १० वी गल्ली
६०) कामाठीपुरा ११ वी गल्ली
६१) नूर मंझिल, फॉकलंड रोड
६२) लक्ष्मी बिल्डिंग, क्लेअर रोड
६३) रिटेबल स्ट्रीट बिल्डिंग क्लस्टर
६४) न्यू स्टार मॅन्शन, के. के. रोड
६५) कोळी चाळ क्र. ३, गणपतराव कदम मार्ग
६६) लक्ष्मी बिल्डिंग, एल्फिन्स्टन रोड
६७) मेहर लॉज, सात रस्ता
६८) साई प्रसाद, मुरारी घाग मार्ग
६९) फिटवाला बिल्डिंग, एल्फिन्स्टन रोड
७०) हाजी कासम चाळ, शहीद अमर शेख मार्ग
७१) खरास बिल्डिंग, एन. एम. जोशी मार्ग
७२) विरा बिल्डिंग, जगन्नाथ भातणकर रोड
७३) दया विरा बिल्डिंग, जगन्नाथ भातणकर रोड
७४) कॉर्नर चेंबर्स, शिवाजी पार्क रोड, दादर
७५) गोरेगावकर वाडी, दादर पश्चिम
७६) हेडवकर वाडी क्र. २, दादर पश्चिम
७७) कुबल निवास, गोखले रोड
७८) इलम महल, एस. के. बोले रोड
७९) जमाल हाऊस, माहीम
८०) आनंद भवन (जुनी इमारत), शिवाजी पार्क
८१) मिनर्वा बिल्डिंग, दादर पूर्व
८२) मिनर्वा मॅन्शन, डॉ. बी. ए. रोड.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Before You Go
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!





















