एक्स्प्लोर

मुंबईत 15 हजार डॉक्टरांची गरज; खासगी डॉक्टरांना सेवा देण्याचा आदेश

मुंबईत 15 हजार डॉक्टर क्लिनिक बंद करुन घरी बसले आहे. आम्ही त्यांना आवाहन केले आहे की तुम्ही सेवा सुरू करा नाहीतर शासकीय रुग्णालयात सर्व्हिस करावी लागेल, असा आदेश राज्य सरकारने काढला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबई : वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णांमुळे मुंबईत जवळपास 15 हजार डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळे साखगी डॉक्टरांनी सेवा देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत यापुढे शासकीय कर्मचारी, पांढरे रेशन कार्ड मधील लोक कोविड असो की नॉन कोविड असो सर्वांना यात वैद्यकीय सुविधा मिळणार आहे. खासगी रुग्णालयात जरी उपचार केला तरी त्याचे पैसे सरकार भरणार आहे. राज्यातील जनतेसाठी राज्य सरकार 1500 कोटी रुपये उतकी रक्कम इन्शुरन्ससाठी भरत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने याचा लाभ घेण्याचे आवाहन टोपे यांनी केलं आहे.

खाजगी डॉक्टरांनी 15 दिवस कोविड-19 चे रुग्ण असलेल्या रुग्णालयांमध्ये सेवा द्यावी, असं आवाहन वैद्यकिय शिक्षण-संशोधन मंडळ संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे. दरम्यान, महापालिकेनं वारंवार आवाहन करुनही अनेक खासगी डॉक्टर्सने आपले दवाखाने, नर्सिंग होन सुरु ठेवलेले नाहीत. त्यामुळे मान्यताप्राप्त आणि पदवीधारक डॉक्टरांनी कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. या आवाहनाला प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते.

17 मेनंतर काय? लॉकडाऊन वाढवण्याचे निकष कोणते? : सोनिया गांधी यांचे सरकारला सवाल

खासगी रुग्णालय अवाजवी दर लावत होते, त्यावर चाप लावण्याचे काम केले असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्शवर्धन यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली. राज्यात एकूण 15 हजार 525 कोरोना बाधित आहेत. तर आतापर्यंत बरे होऊन गेलेल्या रुग्णांचे प्रमाण 25 टक्के इतके आहे. ज्यांना लक्षण नाही त्यांच्याबाबत ICMR निर्णय घेत आहे. क्वॉरंटाईनचा कालावधी 14 दिवसावरून 7 दिवसांवर आणावा आणि दोन चाचण्याऐवजी एक चाचणी करावी, अशी विनंती केंद्राला केल्याची माहिती टोपे यांनी दिली. यावर केंद्राच्या सूचनांची वाट पाहत आहोत.

'आषाढी'वर शिक्कामोर्तब, यंदा असा होऊ शकतो आषाढीचा पालखी सोहळा

राज्यात कोरोनामुळे होण्याऱ्या मृत्यूचा दर 4 टक्के इतका आहे. दरमन्यान राज्यात आताच्या घडीला 54 टेस्टिंग लॅब आहोत. पैकी 30 सरकारी आहे तर, 24 खासगी लॅब आहेत. यात दररोज 8 ते 10 हजार टेस्टिंग होतात. आपण टेस्टिंग करतोय म्हणून रुग्ण जास्त असल्याची माहिती टोपे यांनी दिली. सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असून प्रतिबंधात्मक क्षेत्रात प्रभावी काम करणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात आत्ता 943 प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणजे कंटेनमेंट झोन आहेत. यात जवळपास 11 हजार 629 लोक काम करत आहे. दिलायसादायक म्हणजे राज्याचा कोरोना रुग्णांचा डब्लिंग रेट 10 दिवसांचा आहे, जो देशाबरोबर आहे.

महत्वाचे निर्णय

  • खासगी रुग्णालय अवाजवी दर लावत होते, त्यावर चाप लावण्याचे काम केले आहे.
  • पाच कायद्या अंतर्गत आधार घेऊन कोणी एक लाख रुपये घेत होते तर, कोणी चाळीस हजार रुपये घेत होते.
  • कोविड महामारीचा गैरफायदा, कोणत्याही हॉस्पिटलने घेतला नाही पाहिजे.
  • दर करार जो झाला आहे, तो फॉलो करावा लागणार
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत शासकीय कर्मचारी, पांढरे रेशन कार्ड मधील लोक कोविड असो की नॉन कोविड असो सगळ्यांना कव्हर करण्यात आलं आहे.
  • राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी राज्य सरकार 1500 कोटी इन्शुरन्ससाठी भरत आहे, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा

मुंबईत डॉक्टर्स कमी पडत आहेत, क्रिटिकल पेशटला देखील बेड अपुरे पडत आहे. मुंबईत संरंक्षण विभागाची रुग्णालये आहेत. त्यांचे ICU, आणि बेड देण्याची विनंती केंद्राला केली आहे. त्यांचे डॉक्टर्स देखील मदतीला देण्याची विनंती केल्याचे टोपे यांनी सांगितले. यावर केंद्राने आश्वासन दिले असून हा शेवटचा पर्याय ठेवा, असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेने मात्र त्यांचे रुग्णालय लक्षण नसलेल्या रुग्णांना वापरण्याची परवानगी दिली आहे. मुंबईत 15 हजार डॉक्टर क्लिनिक बंद करुन घरी बसले आहे. आम्ही त्यांना आवाहन केले आहे की तुम्ही सेवा सुरू करा नाहीतर शासकीय रुग्णालयात सर्व्हिस करू.

आषाढीची परंपरा अखंडित राहणार, बैठकीत एकमत, पालखी सोहळ्याबाबत सरकारशी चर्चा करणार

ज्या खासगी डॉक्टरांची सेवा राज्य सरकार घेत आहे, त्यांना त्याप्रमाणे मोबदला देत असल्याचे टोपे यांनी सांगितले. ज्या डॉक्टरांचे वय 55 वर्षापेक्षा अधिक आहे, त्यांना वगळून इतर डॉक्टरांनी राज्याला सेवा देण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे. कारण, सरकारने देखील डॉक्टरांवर खर्च केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा भरण्याचे आदेश दिल्याचे टोपे यांनी सांगितले आहे. राज्यात अंदाजे 20 ते 25 हजार जागा आरोग्य विभाग नर्स, क्लास 4 डॉक्टर भरणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

Lockdown 3 | मुंबईतील रेशनिंग दुकानावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची धाड | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, विखे पाटील याचिका दाखल करणार, अहिल्यानगरमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढले
नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, विखे पाटील याचिका दाखल करणार, अहिल्यानगरमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढले
भारतीय लष्कराकडून तीन सैनिकांसह 7 पाकिस्तानींचा खात्मा, BAT टीमचा चौकीवर हल्ला करण्याचा डाव फसला
भारतीय लष्कराकडून तीन सैनिकांसह 7 पाकिस्तानींचा खात्मा, BAT टीमचा चौकीवर हल्ला करण्याचा डाव फसला
परीक्षा केंद्रावर हत्यारबंद बंदोबस्त द्या, अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल; 12 वी परीक्षेदरम्यान उपप्राचार्यांना भीती
परीक्षा केंद्रावर हत्यारबंद बंदोबस्त द्या, अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल; 12 वी परीक्षेदरम्यान उपप्राचार्यांना भीती
Arvind Kejriwal : इकडं दिल्लीचा फैसला काही तासांवर अन् तिकडं एसबीची टीम अरविंद केजरीवालांच्या घरात पोहोचली!
इकडं दिल्लीचा फैसला काही तासांवर अन् तिकडं एसबीची टीम अरविंद केजरीवालांच्या घरात पोहोचली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP MajhaRahul Gandhi  : लोकसभा आणि विधानसभेची फोटोसह मतदारयादी आम्हाला द्या : राहुल गांधीSuresh Dhas On Walmik Karad Narco Test : आका वाल्मिक कराडची नोर्को टेस्ट करा : सुरेश धसABP Majha Headlines : 3 PM : Maharashtra News : 07 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, विखे पाटील याचिका दाखल करणार, अहिल्यानगरमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढले
नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, विखे पाटील याचिका दाखल करणार, अहिल्यानगरमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढले
भारतीय लष्कराकडून तीन सैनिकांसह 7 पाकिस्तानींचा खात्मा, BAT टीमचा चौकीवर हल्ला करण्याचा डाव फसला
भारतीय लष्कराकडून तीन सैनिकांसह 7 पाकिस्तानींचा खात्मा, BAT टीमचा चौकीवर हल्ला करण्याचा डाव फसला
परीक्षा केंद्रावर हत्यारबंद बंदोबस्त द्या, अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल; 12 वी परीक्षेदरम्यान उपप्राचार्यांना भीती
परीक्षा केंद्रावर हत्यारबंद बंदोबस्त द्या, अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल; 12 वी परीक्षेदरम्यान उपप्राचार्यांना भीती
Arvind Kejriwal : इकडं दिल्लीचा फैसला काही तासांवर अन् तिकडं एसबीची टीम अरविंद केजरीवालांच्या घरात पोहोचली!
इकडं दिल्लीचा फैसला काही तासांवर अन् तिकडं एसबीची टीम अरविंद केजरीवालांच्या घरात पोहोचली!
Chandrashekhar Bawankule : सुप्रिया सुळे ईव्हीएमवरच जिंकल्या, मग राहुल गांधींची नौटंकी का? चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर, मतदानावरही बोलले
सुप्रिया सुळे ईव्हीएमवरच जिंकल्या, मग राहुल गांधींची नौटंकी का? चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर, मतदानावरही बोलले
अभिनेता स्वप्नील जोशी कुंभमेळ्यात, गंगेत डुबकी; दैवी आशीर्वाद म्हणत डोळ्यात आनंदाश्रू
अभिनेता स्वप्नील जोशी कुंभमेळ्यात, गंगेत डुबकी; दैवी आशीर्वाद म्हणत डोळ्यात आनंदाश्रू
धक्कादायक! पुण्यात दुचाकी चालकाचा पोलिसावर हल्ला, डोक्यात घातला दगड, आरोपी फरार   
धक्कादायक! पुण्यात दुचाकी चालकाचा पोलिसावर हल्ला, डोक्यात घातला दगड, आरोपी फरार   
मॅरेथॉनची फिनिशिंग लाइन यशस्‍वी पार करायची? उत्तम पोषणासंदर्भात 'या' स्‍मार्ट टिप्‍स जाणून घ्या; सविस्तर माहिती एका क्लिकवर   
मॅरेथॉनची फिनिशिंग लाइन यशस्‍वी पार करायची? उत्तम पोषणासंदर्भात 'या' स्‍मार्ट टिप्‍स जाणून घ्या; सविस्तर माहिती एका क्लिकवर   
Embed widget