एक्स्प्लोर

17 मेनंतर काय? लॉकडाऊन वाढवण्याचे निकष कोणते? : सोनिया गांधी यांचे सरकारला सवाल

काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सोनिया गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनसंदर्भात केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला.

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन 3 नंतरच्या परिस्थितीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. लॉकडाऊन किती काळासाठी ठेवायचा याचे निकष काय आहेत आणि 17 मे नंतर सरकारकडे कोणत्या योजना आहेत, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सोनिया गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले.

सोनिया गांधी यांनी या बैठकीत कोरोना साथीविरुद्ध लढण्यासाठी सरकारचे प्रयत्न तसंच देशभरात अडकलेले मजूर आणि कामगारांना परत आणण्याबाबतच्या उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा केली. या बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि खासदार राहुल गांधी हे देखील उपस्थित होते.

छत्तीसगड, राजस्थान, पंजाब, पुदुच्चेरी या चार राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. तर महाराष्ट्रात कॉंग्रेसचा समावेश असलेले महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे.

सोनिया गांधी यांनी यावेळी शेतकऱ्यांचे आभारही मानले. त्या म्हणाल्या की, "आम्ही आमच्या शेतकऱ्यांचे विशेषत: पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे आभार मानतो, ज्यांनी अनेक अडचणी असूनही गव्हाचं चांगलं पीक घेऊन अन्न सुरक्षा निश्चित केली."

17 मे नंतर काय? : सोनिया गांधी "17 मेनंतर, काय? आणि 17 मेनंतर, कसे? लॉकडाऊन किती काळ सुरु राहील, हे ठरवण्यासाठी केंद्र सरकारने कोणते निकष ठरवले आहेत? सरकारकडे लॉकडाऊन 3 नंतर कोणती रणनीती आहे?" असे प्रश्न सोनिया गांधी यांनी बैठकीत उपस्थित केले.

सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, लॉकडाऊन 3 नंतर काय? : मनमोहन सिंह बैठकीत उपस्थित माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह म्हणाले की, "सध्या सगळ्यांच्या मनात एकच चिंता किंवा धास्ती आहे की लॉकडाऊन 3 नंतर काय होणार? लॉकडाऊननंतर काय योजना आहेत, याबाबत सरकारने सांगायला हवं."

कोरोनाशी संबंधित मुद्द्यांवर सोनिया गांधी कार्यशील मागील काही दिवसात सोनिया गांधी यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावर कार्यशील दिसल्या. लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या देशभरातील स्थलांतरित मजुरांना मूळगावी परतण्यासाठी कराव्या लागणाऱ्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करेल, अशी घोषणा सोनिया गांधी यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. परराज्यात अडकलेल्या मजुरांकडून तिकीटाचे पैसे आकारले जात असल्याचा आरोप रेल्वे आणि सरकारवर झाल्यानंतर सोनिया गांधींनी हे जाहीर केलं होतं. सोनिया गांधींच्या या घोषणेनंतर पक्षाच्या प्रत्येक नेत्याने सरकारवर हल्लाबोल केला.

त्याआधी सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली होती. ज्यात कोरोना संकटाच्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget