एक्स्प्लोर
मुंबई महापालिकेचा 2944 कोटींचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर, शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी डिजिटलायझेशनसह भर
अर्थ संकल्पात आयसीएसई सीबीएसई आणि इतर बोर्डाच्या शाळांची निर्मिती, मुख्याध्यापकांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण, माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, डिजिटल दुर्बीण, पाणी पिण्यासाठी आठवण करून देणारी शाळेची घंटा, हॅन्ड सॅनिटायझर अशा मोजक्या नव्या योजनांसह पालिकेच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पाची मांडणी केली गेली आहे.
मुंबई : मुंबई महापालिका शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी विशेष तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मागील वर्षी शिक्षण विभागाचा बजेट 2733 कोटी इतका होता तर यंदाच्या 2020-21 बजेटमध्ये 211 कोटींची वाढ करत हा बजेट 2944 कोटी इतका करण्यात आला आहे. काळानुरूप बदलणाऱ्या शिक्षण पद्धतीत बदल होत असताना मुंबई पालिकेद्वारे सादर करण्यात आलेला शिक्षणाचा अर्थसंकल्प काहीसा निराशाजनक ठरला आहे. तर काही अन्य प्रकल्प नव्याने सादर करण्यात आले आहे.
अर्थ संकल्पात आयसीएसई सीबीएसई आणि इतर बोर्डाच्या शाळांची निर्मिती, मुख्याध्यापकांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण, माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, डिजिटल दुर्बीण, पाणी पिण्यासाठी आठवण करून देणारी शाळेची घंटा, हॅन्ड सॅनिटायझर अशा मोजक्या नव्या योजनांसह पालिकेच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पाची मांडणी केली गेली आहे.
हा अर्थसंकल्प 2020-21 शिक्षण विभाग सह आयुक्त आशुतोष सलील यांच्याद्वारे शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांना सादर करण्यात आले. 2020-21या शैक्षणिक अर्थसंकल्पात जुन्या तरतुदींना नव्या घोषणांचे लेबल चिकटवण्यात आले आहे. भाषा प्रयोगशाळा, ई-लायब्ररी, डिजिटल वर्ग, जिम, क्रीडा अकादमी, संगीत अकादमी, शाळांचे मूल्यमापन, खेळांची साधने अशा जुन्याच तरतुदी आहेत.
महानगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या एकूण 467 इमारती असून मार्च 2020 पर्यंत दर्जोन्नती व पुनर्बांधणीची एकूण 38 कामे पूर्ण करणार आहे. उर्वरित 2020-21 मध्ये उर्वरित दुरुस्ती, दर्जोन्नती व पुनर्बांधणीची 75 कामे सुरु राहणार असून त्यासाठी 346 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. टिकरिंग लॅब, समुपदेशन, भाषा प्रयोगशाळा, ई लायब्ररी, संगीत अकादमी, सीसीटीव्ही कॅमेरे, खेळांची साधने, विज्ञान कुतूहल भवन अशा शैक्षणिक उपक्रमाची कार्यवाही 2020-21 मध्ये सुरू राहणार असून त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका शिक्षण अर्थसंकल्प 2020-21
भाषा प्रयोगशाळा
बीएमसी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी इंग्रजी भाषेव्यातरिक्त इतर माध्यमांच्या 25 शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर लँग्वेज लॅब भाषा प्रयोग शाळा सुरू करणार
चेंजिग मुव्हज अँड चेजिंग माइंडस
परदेशी शाळांच्या धर्तीवर ब्रिटिश कौन्सिल , रॉयल अॅकॅडमी ऑफ डान्स व मेरिलॅबोन क्रिकेट यांच्या सहाय्याने पालिकेच्या शाळेत बदलत्या हालचाली आणि बदलत्या मनाचे या उपक्रमाचे प्रायोगिक तत्वावर सुरू करणार आहे. विद्यार्थ्यांच्या एकात्मिक कलागुणांना प्रोत्साहन देणे व त्यानुसार लिंग भेदाची स्त्री पुरुष समानता निर्माण करणे हा या मागचा उद्देश आहे.
डिजिटल क्लासरूम अर्थ संकल्पीय तरतूद
प्राथमिक शाळा - 25 कोटी रुपये
माध्यमिक शाळा - 4 कोटी रुपये
BMC | मुंबई महापालिका शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर | ABP Majha
व्हर्च्युअल क्लासरूम
एकूण 480 VTC शाळांमध्ये लावण्यात येणार
अर्थ संकल्पीय तरतूद
प्राथमिक - 7.21 कोटी
माध्यमिक - 4.38 कोटी
नवीन योजना व उपक्रम
आयसीएसई सीबीएसई व इतर बोर्डाच्या शाळांची निर्मिती
वूलन मिल महापालिका - येथे आयसीएसई शाळा
पूनम नगर महापालिका - येथे सीबीएसई शाळा
प्रायोगिक तत्ववर सुरू करण्यात येणार
वॉटर बेल
शाळेची घंटा पाणी पिण्याची आठवण करून देणार
डिजिटल दुर्बीण
विद्यार्थ्यांना अंतराळ विद्यांनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी बीएमसी च्या विज्ञान कुतूहल केंद्रामध्ये डिजिटल दुर्बीण बसवून छोटी वेदशाळा स्थापन करणार आहे. माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यना आर्थिक सहाय्य
हँड सॅनिटायजर
विद्यार्थ्यांना आजारांवर आळा घालण्यासाठी हँड सॅनीटायजर बसविणार
टिंकरिंग लॅब - तरतूद - 2.27 कोटी
5 वी ते 7 वी विद्यार्थ्यांसाठी बीएमसीच्या 25 माध्यमिक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर विचारशील प्रयोगशाळा सुरू करणार
विद्यार्थ्यांचा जिज्ञासू, वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती या लॅब मध्ये केली जाणार
शालेय वस्तूंचा मोफत पुरवठा - प्राथमिक - 80.64कोटी, माध्यमिक- 31.18 कोटी
बीएमसी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शालेय उपयोगी साहित्य गणवेश मोफत वाटप
ई लायब्ररी
ई-लायब्ररी साठी 1कोटी 54 लाख रूपयांची तरतूद करण्यात आला आहे. बीएमसीच्या 25 माध्यमिक शाळांमध्ये ई बुक व्यवस्थापन प्रणाली राबविण्यात येणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे- तरतूद 20 कोटी
बीएमसी शालेय विद्यार्थी शिक्षक शालेय इमारत, आदी सुविधांना समाजकंटकपासून वाचविण्यासाठी चौथी ते सातवीच्या वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार
समुपदेशन - तरतूद 1 कोटी रुपये
बीएमसी विद्यार्थ्यना बालमानसशास्त्र प्रबोधन व प्रशिक्षणसाठी 12 शहर साधन केंद्रासाठी प्रत्येकी 3 याप्रमाणे 36 समुदेशकाची नियुक्ती करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
विश्व
Advertisement