एक्स्प्लोर

Mumbai Metro: गर्दीच्या वेळी 'अंधेरी ते घाटकोपर' विशेष फेऱ्या; मेट्रो 1 ची 'मिक्स्ड लूप' चाचणी यशस्वी, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Mumbai Metro: मुंबईतील सर्वात गजबजलेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो 1 मार्गिकेवरील प्रवाशांची गर्दीतून सुटका करण्यासाठी 'मुंबई मेट्रो वन'ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Mumbai Metro: मुंबईतील सर्वात गजबजलेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो 1 मार्गिकेवरील प्रवाशांची गर्दीतून सुटका करण्यासाठी 'मुंबई मेट्रो वन'ने (MMOPL) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, आता अंधेरी ते घाटकोपर या सर्वाधिक गर्दीच्या टप्प्यासाठी कमी अंतराच्या म्हणजेच 'मिक्स्ड लूप' (Mixed Loop) मेट्रो फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. गेल्या शनिवारी एमएमओपीएलने याची यशस्वी चाचणी (Successful Trial) घेतली असून, मेट्रो मार्गिकेवर प्रवाशांची गर्दी वाढताच हा पर्याय तात्काळ लागू केला जाणार आहे. या नवीन सुविधेमुळे गर्दीच्या वेळेत दर तासाला अतिरिक्त 20 हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे.

Mumbai Metro: 88 टक्के प्रवासी केवळ अंधेरी-घाटकोपरदरम्यान

मेट्रो 1 मार्गिकेची एकूण लांबी 11.4 किलोमीटर असून, त्यावर एकूण 12 स्थानके (Stations) आहेत. सध्या या मार्गावर 4 डब्यांच्या गाड्या चालविल्या जात आहेत. मेट्रो प्रशासनावर असलेल्या कर्जाच्या बोज्यामुळे नवीन गाड्या खरेदी करणे किंवा 6 डब्यांची ट्रेन चालवणे सध्या मर्यादांचे ठरत आहे. सध्या कार्यालयीन दिवशी या मार्गावर रोज 5 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि पूर्व उपनगरांतून रेल्वे किंवा बसने येणारे बहुतांश प्रवासी घाटकोपर स्थानकातून मेट्रो पकडतात. धक्कादायक बाब म्हणजे, मेट्रो १ मधील एकूण प्रवाशांपैकी 88 टक्के प्रवासी हे केवळ घाटकोपर ते अंधेरीदरम्यानच प्रवास करतात. पावसाळ्यात ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ही विशेष तयारी केली आहे.

Mumbai Metro: नेमका काय आहे हा 'मिक्स्ड लूप' बदल?

सध्या घाटकोपरहून निघालेली मेट्रो थेट शेवटच्या वर्सोवा स्थानकापर्यंत जाते आणि तिथून परत येते. मात्र, नव्या मिक्स्ड लूप बदलानुसार, घाटकोपर स्थानकातून सुटलेली एक गाडी केवळ अंधेरीपर्यंतच जाईल आणि तिथूनच पुन्हा घाटकोपरसाठी मागे फिरेल. स्थानकावरून सुटणाऱ्या दोन गाड्यांपैकी एक गाडी केवळ अंधेरीपर्यंत धावेल, तर दुसरी गाडी नेहमीप्रमाणे वर्सोव्यापर्यंत जाईल. यामुळे सर्वाधिक गर्दी असलेल्या टप्प्याला जास्तीत जास्त गाड्या मिळतील. हा बदल लागू झाल्यावर गाड्यांची वारंवारिता 6 ते 7 टक्क्यांनी वाढेल. यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या 482 पर्यंत वाढवता येईल, म्हणजेच दर तासाला 3 अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध होतील.

Mumbai Metro: गाड्यांच्या वेळेत काय बदल होणार?

मेट्रो 1 मार्गिकेवर सध्या गर्दीच्या वेळेत गाड्या दर 3 मिनिटे 20 सेकंदांनी धावतात, तर गर्दी नसलेल्या वेळेत त्या 5 मिनिटे 55 सेकंदांनी धावतात. ‘मिक्स्ड लूप’ वेळापत्रक लागू केल्यानंतर घाटकोपर ते अंधेरी दरम्यान गाड्या 3 मिनिटे 8 सेकंदांनी धावतील, तर वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान सेवा 5 मिनिटे 16 सेकंदांच्या अंतराने उपलब्ध होईल. प्रवाशांची मागणी वाढल्यास हे सुधारित वेळापत्रक लागू केले जाईल. गर्दीच्या भागात उपलब्ध क्षमतेचा अधिक कार्यक्षम वापर करून प्रवाशांना अधिक चांगली आणि जलद सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Mumbai Rain Andheri Subway Photo: मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली, रिक्षा बुडाली, चालकाला बाहेर खेचले, PHOTO

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget