Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो 3 ला भरभरून प्रतिसाद, पहिल्याच दिवशी एक लाख प्रवाशांचा प्रवास; CSMT आणि चर्चगेटवर इमर्जन्सी गेट उघडले
Mumbai Metro Aqua Line 3 : मेट्रो 3 ही भूमिगत मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने येत्या काळात प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : मुंबई मेट्रो 3 ला (Mumbai Metro Line 3) पहिल्याच दिवशी प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला असून जवळपास एक लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यावेळी मेट्रोच्या सीएसएमटी (CSMT Metro Station) आणि चर्चगेट (Churchgate Metro Station) या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ही गर्दी इतकी होती की सगळ्या इमर्जन्सी गेटवरून एन्ट्री आणि एक्झिट करावी लागली. सकाळी 5.55 वाजता सुरू झालेली मेट्रो 3 ही रात्री 10.30 पर्यंत सुरू राहणार आहे.
मुंबई मेट्रो 3 म्हणजे अॅक्वा लाईनची आरे जेव्हीएलआर ते कफ परेड अशी सेवा गुरुवारपासून सुरू झाली. या लाईनवर प्रवाशांनी देखील उदंड प्रतिसाद दिला. गुरुवारी, पहिल्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत 97 हजार 846 प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो 3 ही पूर्णतः भूमिगत मेट्रो असून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Metro Line 3 Aqua Line : मेट्रो 3 तीन टप्प्यात सुरू
पहिला टप्पा आरे ते बीकेसी (Aarey ते BKC) आधीच सुरू आहे.
दुसरा टप्पा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (BKC ते Acharya Atre Chowk) देखील सुरू आहे.
तिसरा टप्पा म्हणजे आचार्य अत्रे ते कफ परेड (Acharya Atre Chowk ते Cuffe Parade) याचे पंतप्रधान मोदींनी 8 ऑक्टोबर 2025 रोजी उद्घाटन केलं.
Metro Line 3 Aqua Line 3rd Phase : मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्यातील सुरू झालेले स्टेशन्स -
1. आचार्य अत्रे चौक (Acharya Atre Chowk)
2. सायन्स म्युझियम (Science Museum)
3. महालक्ष्मी (Mahalaxmi)
4. मुंबई सेंट्रल (Mumbai Central)
5. ग्रँट रोड (Grant Road)
6. गिरगांव (Girgaon)
7. काळबादेवी (Kalbadevi)
8. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
9. हुतात्मा चौक (Hutatma Chowk)
10. चर्चगेट (Churchgate)
11. विधान भवन (Vidhan Bhavan)
12. कफ परेड (Cuffe Parade)
Mumbai Aqua Line Metro 3 Stations List : मुंबई मेट्रो 3 ची 27 स्थानकांची यादी
1. आरे जेव्हीएलआर (Aarey)
2. सीप्झ (SEEPZ)
3. एमआयडीसी (MIDC)
4. मरोळ नाका (Marol Naka)
5. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 (CSMIA T2)
6. सहार रोड (Sahar Road)
7. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनल 1 (CSMIA T1)
8. सांताक्रूझ (Santacruz)
9. विद्यानगरी (Vidyanagri)
10. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra Kurla Complex - BKC)
11. धारावी (Dharavi)
12. शीतलादेवी मंदिर (Shitladevi Temple)
13. दादर (Dadar)
14. सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple)
15. वरळी (Worli)
16. आचार्य अत्रे चौक (Acharya Atre Chowk)
17. सायन्स म्युझियम (Science Museum)
18. महालक्ष्मी (Mahalaxmi)
19. मुंबई सेंट्रल (Mumbai Central)
20. ग्रँट रोड (Grant Road)
21. गिरगांव (Girgaon)
22. काळबादेवी (Kalbadevi)
23. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus - CSMT)
24. हुतात्मा चौक (Hutatma Chowk)
25. चर्चगेट (Churchgate)
26. विधान भवन (Vidhan Bhavan)
27. कफ परेड (Cuffe Parade)
ही बातमी वाचा:























