एक्स्प्लोर
Mumbai Metro Line 3 Aqua Line: मुंबई मेट्रो लाईन-3 चं आज अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन; आता 3 तासांचं अंतर फक्त 1 तासात, आरे ते कफ परेड, भाडं किती, वेळापत्रक काय?
Mumbai Metro Line 3 Aqua Line: मुंबईकरांची मेट्रोसाठीची प्रतिक्षा आता संपणार आहे. आज 9 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो लाईन-3 (अक्वा लाईन) च्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत.

Mumbai Metro Line 3 Aqua Line
Source : ABP
Mumbai Metro Line 3 Aqua Line मुंबई: मुंबईकरांची मेट्रोसाठीची प्रतिक्षा आता संपणार आहे. आज 9 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi In Mumbai) मुंबई मेट्रो लाईन-3 (अक्वा लाईन) च्या (Mumbai Metro Line 3) अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत. मेट्रो लाईन 3 आचार्य अत्रे चौक (वरळी) आणि कफ परेड यांना जोडणार आहे.
मुंबई मेट्रो लाईन-3 ची माहिती- (Mumbai Metro Line 3 Aqua Line)
या मेट्रो लाईनची एकूण लांबी 33.5 किलोमीटर आहे, ज्यामध्ये कफ परेड ते आरे कॉलनी दरम्यान 27 स्थानके आहेत. पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर आरे-जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) ते कफ परेड हे अंतर काही मिनिटांत पूर्ण होणार आहे.
महत्वाच्या ठळक बाबी – मेट्रो लाईन-3 (MMRC प्रकल्प)- (Metro Line 3 Aqua Line Project)
- मुंबईच्या इतिहासातील पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो लाईन म्हणजेच लाईन-3. ही लाईन संपूर्ण 33.5 किमी लांबीची असून पूर्णपणे अंडरग्राउंड आहे. हा प्रकल्प मुंबईला जागतिक दर्जाच्या अंडरग्राउंड मेट्रो असलेल्या शहरांच्या यादीत आणणार आहे.
- 26 अत्याधुनिक स्थानके – प्रत्येक स्थानकात अनेक प्रवेशद्वारे, अपंगांसाठी रॅम्प आणि लिफ्ट्स, तसेच आधुनिक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. सीसीटीव्ही आणि डिजिटल साईनेजच्या मदतीने प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यात आली आहे.
- वाहतूक आणि प्रदूषण कमी होणार – कफ परेड ते आचार्य अत्रे चौक हे अंतर आता काही मिनिटांत पूर्ण होणार आहे, ज्यामुळे वेळ आणि उर्जेची बचत होईल. यामुळे दरवर्षी सुमारे 2.61 लाख टन CO₂ उत्सर्जन कमी होण्याचा अंदाज आहे.
- टिकिटिंग सिस्टिम – ‘वन नेशन, वन कार्ड’ – या योजनेअंतर्गत प्रवासी एकाच कार्डद्वारे मेट्रो, बेस्ट बस, लोकल ट्रेन, मोनोरेलमध्ये प्रवास करू शकतील. भाडं ₹10 ते ₹70 दरम्यान असून सर्वसामान्यांसाठी परवडणारे आहे.
- प्रत्येक 5 मिनिटांनी मेट्रो सेवा – नवीन तंत्रज्ञान आणि पूरक सेवा वापरून प्रवाशांना दर 5 मिनिटांनी मेट्रो सेवा मिळणार आहे. ही लाईन इतर मेट्रो प्रकल्पांशी जोडली जाणार असून, मुंबईसाठी एक एकात्मिक सार्वजनिक वाहतूक जाळं तयार होणार आहे.
याआधीचे टप्पे- (Metro Line 3 Aqua Line)
- मुंबईमध्ये याआधीच 2 भूमिगत मेट्रो टप्पे सुरु झाले आहेत.
- आरे ते BKC मार्ग – ऑक्टोबर 2022 पासून सुरु असून लांबी सुमारे 13 किमी आहे. या मार्गात आरे, SEEPZ, MIDC, मरोल नाका, एअरपोर्ट टर्मिनल T2, सहार रोड, एअरपोर्ट T1, सांताक्रूझ, बांद्रा कॉलनी आणि BKC ही स्थानके आहेत.
- BKC ते वर्ली (आचार्य अत्रे चौक) – मे 2025 मध्ये सुरु झाला, सुमारे 10 किमी लांब. यामध्ये धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वर्ली आणि आचार्य अत्रे चौक ही स्थानके आहेत.
- मेट्रो लाईन 3 वर एकूण 27 स्थानके असतील – त्यातील 26 भूमिगत आणि 1 जमिनीवरचं (आरे कॉलनी) असेल. ही लाईन मुंबईतील महत्वाच्या भागांना एकमेकांशी जोडेईल.
वेळापत्रक आणि भाडं- (Metro Line 3 Aqua Line Schedule and fares)
- आरे ते आचार्य अत्रे चौक – पूर्णतः सुरु झालेला भाग – लांबी 22.46 किमी.
- भाडं: अंतरानुसार ₹10 ते ₹50 दरम्यान.
- पूर्ण लाईन सुरु झाल्यावर आरे ते कफ परेड प्रवासासाठी ₹70 भाडं अपेक्षित आहे.
- आरे ते अत्रे चौकचा प्रवास सुमारे 36 मिनिटांत पूर्ण होतो.
- अखेरच्या टप्प्यानंतर संपूर्ण प्रवास 1 तासाच्या आत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
सेवा वेळा आणि फ्रीक्वेन्सी- (Metro Line 3 Aqua Line Time Table)
- पहिली ट्रेन – सकाळी 5.55 वाजता (पूर्वी 6.30 होती)
- शेवटची सेवा – रात्री 10.30 वाजता
- पिक आणि नॉन-पिक वेळेत – दर 6-7 मिनिटांनी मेट्रो.
- अखेरच्या टप्प्यातही हीच वेळापत्रक राहण्याची शक्यता.
नवी मुंबई विमानतळाचं आज लोकार्पण, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















