Mumbai Megablock:मुंबईच्या तिन्ही रेल्वेमार्गांवर रविवारी मेगाब्लॉक! 'या' लोकल बंद राहणार, काहींचा मार्ग बदलणार, कसं असेल वेळापत्रक?
मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर नवीन पादचारी पूल उभारणीच्या कामासाठी शनिवारी आणि रविवारी विशेष पॉवर ब्लॉक असणार आहे.

Mumbai Megablock: मुंबईतील लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी शनिवार आणि रविवारी (9 मार्च) अडथळ्यांचा ठरणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक आणि विशेष पॉवर ब्लॉक घेतले जाणार असल्याने काही लोकल गाड्या रद्द राहतील, तर काही गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे मुंबईकरांना प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे लागणार आहे. (Mumbai) शनिवारी (8 मार्च) मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर नवीन पादचारी पूल उभारणीच्या कामासाठी शनिवारी आणि रविवारी विशेष पॉवर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी 11:40 ते दुपारी 12:10 आणि रविवारी सकाळी 11:40 ते दुपारी 12:10 तसेच दुपारी 4 ते संध्याकाळी 4:25 या वेळेत ब्लॉक असेल. या काळात काही लोकल गाड्या कसारा स्थानकापर्यंत येणार नाहीत आणि त्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील.
मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11:15 ते दुपारी 3:45 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटीहून सुटणाऱ्या 10:56 AM ते 3:10 PM या वेळेतल्या डाउन फास्ट लोकल गाड्या माटुंगा स्थानकात धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.त्याचप्रमाणे, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:40 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेल तसेच वांद्रे आणि गोरेगावकडे जाणाऱ्या लोकल सेवा बंद राहणार आहेत. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल - कुर्ला - पनवेलदरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गिकेच्या प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- मध्य रेल्वेवर रविवारी (9 मार्च) सकाळी 11:15 ते दुपारी 3:45 या वेळेत माटुंगा ते मुलुंड अप-डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल.
- तसेच, सकाळी 11:10 ते दुपारी 4:40 या वेळेत सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप-डाउन हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे.
- या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीवरून वाशी, बेलापूर, पनवेल आणि वांद्रे, गोरेगावकडे जाणाऱ्या सेवा बंद राहतील. मात्र, पनवेल - कुर्ला - पनवेलदरम्यान काही विशेष लोकल सेवा चालविल्या जातील.
- हार्बर मार्गिकेच्या प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची परवानगी असेल.
पश्चिम रेल्वेवरही वाहतूक विस्कळीत
पश्चिम रेल्वेवरही वाहतूक विस्कळीत होणार आहे. वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री 11:30 ते रविवारी पहाटे 3:30 या वेळेत अप जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या काळात जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत, त्यामुळे प्रवाशांनी अतिरिक्त वेळ गृहीत धरावा. याशिवाय, मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर नवीन पादचारी पूल उभारणीच्या कामासाठी शनिवारी आणि रविवारी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 11:40 ते दुपारी 12:10 आणि रविवारी सकाळी 11:40 ते दुपारी 12:10 तसेच दुपारी 4 ते संध्याकाळी 4:25 या वेळेत ब्लॉक असेल. या काळात काही लोकल गाड्या कसारा स्थानकापर्यंत येणार नाहीत आणि त्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील. मुंबईतील रेल्वे प्रवासावर या ब्लॉकचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना पूर्वतयारी करून प्रवास करावा लागणार आहे.
हेही वाचा:

























