एक्स्प्लोर

नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्याबद्दल अखेर मुंबईच्या महापौरांना ई-चलान

'मालवणी आस्वाद' या हॉटेलसमोरील गल्ली अरुंद असल्यामुळे त्या भागात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा भाग नव्या पार्किंग धोरणानुसार 'नो पार्किंग' म्हणून जाहीर करण्यात आला.

मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या सरकारी गाडीला अखेर ई-चलान पाठवण्यात आलं आहे. विलेपार्लेमध्ये 'नो पार्किंग झोन'ला कार पार्क केल्याप्रकरणी मुंबई वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबईत सध्या महापालिका आयुक्तांनी पार्किंगचं नवं धोरण जारी केलं आहे. त्यानुसार वाहनतळाच्या 500 मीटरपर्यंतच्या क्षेत्रात अनधिकृत पार्किंग आढळल्यास पाच ते 15 हजार रुपये दंड ठोठावण्याची तरतूद आहे. महापौर 'मालवणी आस्वाद' या हॉटेलबाहेरील 'नो पार्किंग झोन'मध्ये कार पार्क करुन कोलडोंगरी परिसरात गेले. 'मालवणी आस्वाद' या हॉटेलसमोरील गल्ली अरुंद असल्यामुळे त्या भागात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा भाग नव्या पार्किंग धोरणानुसार 'नो पार्किंग' म्हणून जाहीर करण्यात आला. खुद्द महापौरांचीच गाडी नो पार्किंग झोनमध्ये, महाडेश्वरांना दंड ठोठावणार? खुद्द महापौरांनीच नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला. त्यानंतर प्रशासन आणि महापौरांवर सर्वसामान्यांकडून टीका केली जात होती. नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केली नव्हती, तर उतरण्यासाठी गाडी तिथे थांबवली होती, त्यामुळे नियमांचं उल्लंघन झाल्याचं म्हणता येणार नाही, असं स्पष्टीकरण विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलं होतं. तसंच पावती आल्यास दंडाची रक्कम भरु, असंही महापौरांनी सांगितलं. अखेर मुंबई वाहतूक पोलिसांनी महापौरांच्या गाडीलाही दंड ठोठावला आहे. पार्किंगचे सध्याचे दर महापालिकेच्या वाहनतळांवर सध्या तीन ते चार चाकी वाहनांना एक तास ते 24 तासांसाठी 25 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत, दोन चाकी वाहनांना 10 ते 35 रुपये, ट्रक - 35 ते 205 रुपये, रिक्षा-टॅक्सी - 25 ते 80 रुपये आणि बससाठी 25 ते 145 रुपये वाहनतळ शुल्क घेतले जाते. मुंबईतील वाहनतळांच्या शुल्कानुसार वाहनतळ शुल्काचे दर काही प्रमाणात कमी-जास्त आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Embed widget