Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर
Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.

Raj Thackeray Meet Devendra Fadnavis मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईतील वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान, कोकणातील रस्ते, त्यासोबतच शिवाजी पार्क मैदानाचा विषय संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. (Raj Thackeray Meet Devendra Fadnavis)
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 9 ऑगस्ट रोजी राज ठाकरेंनी यांनी रायगडमधील माणगाव बायपासजवळ जाऊन मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी देखील केली होती. मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, स्थानिक राजकीय हस्तक्षेप आणि विकासकामांमध्ये पारदर्शकता यावर राज ठाकरेंनी भाष्य केले होते. कामापेक्षा आपल्याला टक्के कसे मिळतील याचाच विचार केला जातोय, असा आरोपही राज ठाकरेंनी केला होता. त्यानंतर आज राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी रस्ते आणि विविध मुद्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. (Raj Thackeray Meet Devendra Fadnavis)
मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचा आक्रमक पवित्रा- (Raj Thackeray On Mumbai Goa Highway)
गेली 17 वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम रखडले असून त्याचा कोकणवासीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामध्ये माणगाव बायपासचे (Mangaon Bypass Road) रखडलेले काम मोठा अडसर ठरत आहे. याच कामाची राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाहणी केली होती. तसेच पत्रकार परिषद घेऊन राजकीय हस्तपेक्षामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला, असं राज ठाकरे यांनी सांगितले. आमच्या जमिनी, आमचं पाणी आणि यावर बाहेरचे लोक पोसले जाणार आहेत. कोकणात आपल्या पायाखालच्या जमिनी खेचल्या जातायत आणि त्यामुळे असं वाटतंय की आता विकासच नको. 15 वर्षांपासून तीच गोष्ट सुरू आहे. तेच खड्डे, तोच ट्रॅाफिक जाम...आपल्याकडे निवडणुकीत तेच तेच विषय असतात. नोकरी, पाणी, रस्ते..., असंही राज ठाकरे म्हणाले. सगळे आमदार एकत्र आली असती तर इतकी वर्षे लागली नसती, असंही राज ठाकरे म्हणाले.
Before You Go
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
महत्त्वाच्या बातम्या






















