एक्स्प्लोर
Advertisement
राणी बागेत महापौरांचं वास्तव्य योग्य नाही, महाडेश्वरांचं आयुक्तांना पत्र
मुंबई : "राणी बागेतील बंगला देण्याऐवजी मलबार हिल येथील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला द्यावा," अशी मागणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे. यासंबंधी महापौरांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र लिहिलं आहे.
"राणीच्या बागेत महापौरांचे वास्तव्य योग्य नाही. महापौरांना भेटायला अनेक परदेशी पाहुणे येतात. महापौर निवासस्थानी अनेक कार्यक्रमांचे आयोजन होतं. तसंच राणी बाग हे शांतता क्षेत्र असून महापौरपदाला शोभेल असा बंगला द्यावा," अशी मागणी महाडेश्वर यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात होणार आहे. तर भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील बंगला हे महापौरांचं पर्यायी निवासस्थान असेल. परंतु विश्वनाथ महाडेश्वर नव्या निवासस्थानावर नाखुश आहेत.
संबंधित बातम्या
महापौर बंगला बाळासाहेबांच्या स्मारकासाठी द्या : मुख्यमंत्र्यांचं पत्रअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रीडा
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement