एक्स्प्लोर
मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, आजारपणात बळजबरीने निवडणुकीचं काम करायला लावल्याचा आरोप
प्रिती अत्राम धुर्वे यांना दीड वर्षांची जुळी मुलं आहेत. तर पत्नीच्या जाण्याने पतीची प्रकृती अस्वस्थ आहे.
मुंबई : मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागातील कर्मचारी प्रिती अत्राम-धुर्वे यांचा आज मृत्यू झाला. आजारी असतानाही बळजबरीने लोकसभा निवडणुकीचं काम करायला लावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी केला आहे.
आजारपणामुळे रजेचा अर्ज
प्रिती अत्राम धुर्वे यांना 18 एप्रिल रोजी कावीळ झाली होती. यामुळे रजेसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज केला होता. मात्र शिवडी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची रजा मंजूर केली नाही. त्यामुळे कावीळ असूनही त्यांनी दहा दिवस उन्हात काम केलं.
मात्र 29 एप्रिल रोजी मुंबईतील मतदानाच्या दिवशी अस्वस्थ वाटू लागल्याने प्रिती यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना नायर रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे उपचार सुरु असताना आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कुटुंबीयांचा आरोप
आजारी असूनही प्रिती यांच्याकडून बळजबरीने निवडणुकीचं काम करुन घेतल्याचा आरोप कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी केला आहे. "संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी आणि कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी," अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
प्रिती यांना दीड वर्षांची जुळी मुलं आहेत. तर पत्नीच्या जाण्याने पतीची प्रकृती अस्वस्थ आहे. "अधिकाऱ्यांनी पत्नीचा अर्ज स्वीकारला नाही. कोणतीही मदत अथवा सांत्वन प्रशासनाने केलेलं नाही," असं प्रिती यांचे पती लोकेश धुर्वे यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement