एक्स्प्लोर

Molestation Case: विनयभंगाच्या कलमाअंतर्गत आरोपी महिला दोषी; मुंबईतील दंडाधिकारी कोर्टाचा निकाल

Molestation Case In Mumbai: एका महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी महानगर दंडाधिकारी कोर्टाने महिला आरोपीला एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Molestation Case In Mumbai: विनयभंगाच्या आरोपातंर्गत (Molestation Case) मुंबईतील कोर्टानं एक महिलेला दोषी ठरवलं आहे. पुरुषांप्रमाणेच महिलेकडूनही दुसऱ्या महिलेवर विनयभंग होऊ शकतो. तो करण्याच्याच हेतूनं बळाचा वापर करून किंवा तिला मारहाण झाली असेल तर आरोपी महिलेलाही विनयभंगाच्या आरोपांतर्गत दोषी ठरवता येऊ शकतं. एखाद्या स्त्रीला या आरोपांतून वगळण्यात यावं, असं कायद्यात कुठेही नमूद करण्यात आलेलं नाही. असं स्पष्ट करत माझगाव कोर्टानं (Mazgaon Magistrate Court ) एका महिलेला वर्षभराच्या कारावासाची शिक्षा आणि 6 हजारांचा दंडही ठोठावला आहे.

शेजारी राहणाऱ्या दोन महिलांमध्ये झालेल्या भांडणात एकीनं दुसरीला मारहाण करून तिचे कपडे फाडल्याप्रकरणात महानगरदंडाधिकारी कोर्टानं नुकताच हा निकाल दिला आहे.

Maharashtra Mumbai News : काय आहे प्रकरण

आरोपी आणि तक्रारदार महिलेच्या कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आणि भांडणं होती. त्यातच दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडण्यादरम्यान आरोपी महिलेनं तक्रारदार महिलेवर आधी एक चप्पल फेकली आणि त्यानंतर दुसऱ्या चप्पलनं तिच्या डोक्यावर मारलं. त्यानंतर आसपासच्या लोकांनी त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीनं आपला गळा पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि आपले कपडे फाडले, अशी तक्रार महिलेनं या भांडणानंतर पोलिसांत दिली. त्यामुळे आरोपी महिलेनं आपल्याला मारहाण करून विनयाचा भंग केला तसेच कपडे फाडून वैयक्तिक जगण्याच्या अधिकाराचाही भंग केला. इतकंच काय, तर भांडणात तिनं आपल्या पतीला माझ्यावर बलात्कार करण्यासही सांगितलं. यावेळी इमारतीतील सर्व पुरुष तेथे उपस्थित होते, असंही तक्रारदार महिलेनं पोलीस तक्रारीत म्हटले होते.  

Maharashtra Mumbai News : न्यायालयाचे निरीक्षण 

माझागव कोर्टाचे दंडाधिकारी एम. व्ही. चव्हाण यांच्यापुढे याप्रकरणावर सुनावणी झाली. तक्रारदार महिलेचा सर्वांसमोर विनयभंग होईल, अशी वागणूक आरोपीनं दिली असून तिचे कपडे आरोपीनंच फाडल्याचं सगळ्या साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीपुराव्यांवरून सिद्ध झाले असल्याचे कोर्टाने म्हटले. पुरुषांप्रमाणेच महिलेकडूनही एखाद्या महिलेवर विनयभंग करण्याच्या हेतूने बळाचा वापर करून किंवा तिला मारहाण करण्यात येत असेल तर महिलेलाही विनयभंगाच्या आरोपांतर्गत दोषी ठरवता येऊ शकते. एखाद्या स्त्रीला या आरोपांतून वगळण्यात यावं, असं कायद्यात कुठेही नमूद करण्यात आलेलं नाही, असं स्पष्ट करत न्यायालयानं आरोपीला विनयभंगाच्या आरोपांखाली दोषी ठरवलं. मात्र आरोपी महिला तीन मुलांची आई असल्यामुळे तिला पाच वर्षांच्या शिक्षेऐवजी एक वर्षाची शिक्षा ठोठावत 6 हजार रुपयांचा दंडही सुनावला.

महत्त्वाच्या बातम्या

खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अॅडव्हान्स, संजय राऊतांच्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी?
खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अॅडव्हान्स, संजय राऊतांच्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी?
IAS Transfer : प्रशासकीय फेरबदलांचा वेग कायम , राज्यातील 12 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
IAS Transfer : प्रशासकीय फेरबदलांचा वेग कायम , राज्यातील 12 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'वर मात करण्यासाठी ठाकरेंचे शिलेदार सरसावले; अरविंद सावंत, संजय राऊत आणि अनिल देसाई दिल्लीत
शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'वर मात करण्यासाठी ठाकरेंचे शिलेदार सरसावले; अरविंद सावंत, संजय राऊत आणि अनिल देसाई दिल्लीत
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget