एक्स्प्लोर

Mumbai Train Accident : गरिबीत शिकला, सेल्समन झाला, पण लोकल अपघाताने सगळंच संपलं; कुटुंबाची जबाबदारी असलेला 23 वर्षांचा केतन कधीच परतणार नाही

Mumbra Train Accident : केतन सरोजच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं. एका उमद्या तरुणाच्या मृत्यूमुळे उल्हासनगरमध्ये शोककळा पसरली आहे. 

ठाणे : मुंब्र्यातील अपघातात चार प्रवाशांनी आपला जीव गमावला. त्यामध्ये उल्हासनगरचा तरूण केतन सरोजचाही मृत्यू झाला. अवघ्या 23 वर्षांचा केतन हा गेल्या तीन महिन्यांपासून ठाण्यात नोकरी करायचा. आई, वडील आणि दोन छोटे भाऊ असं केतनचं कुटुंब. रोजसारखाच आजही केतन कामासाठी घराबाहेर पडला पण आता तो कधीच परतणार नाही. 

मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये उल्हासनगर 1 मधील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या केतन दिलीप सरोज याचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने हनुमान नगर परिसरात एकच शोककळा पसरली. या घटनेमुळे केतनची आई-वडील, भाऊ आणि कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.

Mumbai Train Accident : एकुलता एक कमावणारा मुलगा

केतन सरोज याच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असताना त्याने आपलं शिक्षण बीकॉम पर्यंत पूर्ण केलं. त्यानंतर त्याला ठाण्यात एका खाजगी कंपनीत सेल्समॅनची नोकरी मिळाली. केतन हा घरातील एकुलता एक कमावणारा मोठा मुलगा होता आणि त्याच्यामुळे घरातील उदरनिर्वाह सुरू होता. परंतु त्याच्या या अपघाती मृत्यूमुळे सरोज कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Mumbai Railway Accident : कामाला गेला, परतलाच नाही

नेहमीप्रमाणे केतन सरोज कामावर जाण्यासाठी निघाला होता. परंतु मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातात केतनचा रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप करताना याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच असल्याचे सांगितले आहे. 

याआधी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. आज आमच्या कुटुंबीयातील एक सदस्य गेला आहे. उद्या आणखी दुसऱ्या कुटुंबाला अशाच परिस्थितीला सामोरं जावं लागेल असं सरोज कुटुंबीयांनी म्हटलं.

Mumbra Train Accident : लोकलमधून पडून चार जणांचा मृत्यू

आजूबाजूच्या उपनगरांमध्ये राहणारा आणि मुंबईत कामाला जाणाऱ्याला रोज जीवघेण्या गर्दीत मृत्यूला हुलकावणी देत प्रवास करावा लागतो. मात्र आज मृत्यूनं मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ चार प्रवाशांवर झडप घातलीच आणि अनेकांना गंभीर जखमी केलं. कसऱ्याहून मुंबई सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी, आणि सीएसएमटीवरून कल्याणच्या दिशेनं जाणारी लोक एकमेकांना क्रॉस करत असताना हा अपघात घडला. 

दोन्ही लोकलमध्ये दरवाज्यावर उभे असणारे प्रवासी एकमेकांना घासले गेले. एकूण 13 प्रवासी लोकलमधून खाली पडले. त्यातल्या चौघांचा मृत्यू झाला. तर इतर जखमी झालेत. जखमींवर कळव्यातील सरकारी रूग्णालय आणि ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Mumbai Local Train Accident : अपघातांना आळा बसणार का? 

मुंबई लोकलमधून प्रवास करताना होणारे अपघात रोखण्यासाठी ऑटोमेटेड डोअर क्लोजर म्हणजेच, लोकलला स्वतःहून बंद होणारे दरवाजे बसवण्याची कल्पना मांडली जातेय. त्यासाठी रेल्वे प्रशासन कामाला देखील लागलंय. मात्र स्वतःहून बंद होणारे दरवाजे लावल्यानंतर अपघातांना आळा बसेल का असा प्रश्न अनेक लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी या संकल्पनेला तीव्र विरोध केला.

महत्त्वाच्या बातम्या

दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
पर्युषण पर्वात शाळेत कांदा, लसूण नको म्हणणाऱ्या भाजप आमदाराच्या हॉटेलमध्ये जोरात विक्री; मनसेनं उघडं पाडलं
पर्युषण पर्वात शाळेत कांदा, लसूण नको म्हणणाऱ्या भाजप आमदाराच्या हॉटेलमध्ये जोरात विक्री; मनसेनं उघडं पाडलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचं आवाहन, मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय, न्यायदेवता ते सरकार नेमकं काय म्हणाले पाटील?
मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचं आवाहन, मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय, न्यायदेवता ते सरकार नेमकं काय म्हणाले पाटील?

व्हिडीओ

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Embed widget