एक्स्प्लोर
बेलापूरला जाणारी लोकल वांद्र्याला जाते तेव्हा...
बेलापूरला जाणारी लोकल सोमवारी रात्री सीएसटी स्थानकावरुन निघाली खरी, मात्र इप्सित स्थळी जाण्याऐवजी ती चुकून वांद्र्याच्या दिशेने वळली.
मुंबई : जाना था जपान.. पहुंच गये चीन.. हे वाक्य 'म्हण' म्हणून ऐकायला बरं वाटतं. पण मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना हा हास्यास्पद अनुभव प्रत्यक्षात आला. कारण बेलापूरला निघालेली लोकल चक्क वांद्र्याच्या दिशेने वळली.
बेलापूरला जाणारी लोकल सोमवारी रात्री सीएसटी स्थानकावरुन निघाली खरी, मात्र इप्सित स्थळी जाण्याऐवजी ती चुकून वांद्र्याच्या दिशेने वळली. लोकलची दिशा बदलताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
प्रवाशांना अखेर किंग्ज सर्कल स्थानकावर उतरवण्यात आलं. ही लोकल तिथेच थांबवण्यात आली आणि प्रवाशांची माफी मागून त्यांना दुसऱ्या लोकलने जाण्यास सांगण्यात आलं.
खरं तर अंधेरी आणि बेलापूर हे दोन वेगवेगळे मार्ग असल्यामुळे हा गोंधळ कसा झाला, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यामागे कोणाची चूक आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.
या गोंधळामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत होती. लोकल वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत होती. हार्बर मार्गावर गेल्या काही दिवसात दुसऱ्यांदा ही नामुष्कीची घटना घडल्यामुळे आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement