Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो, आज मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक; पश्चिम मार्गावर माहीम ते सांताक्रूझ दरम्यानचा मार्गही बंद
Mumbai Local Megablock : आज मुंबई लोकलवरील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि हार्बरवर वाशी ते कुर्लादरम्यान मेगाब्लॉक, तर पश्चिम मार्गावर माहीम ते सांताक्रूझ दरम्यानचा मार्गही बंद.
Mumbai Local Megablock Updates: मुंबईकरांनो, आज मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणार असाल, तर घराबाहेर पडण्यापूर्वीच मुंबई लोकलचं वेळापत्रक (Mumbai Local Timetable) पाहून मगच बाहेर पडा. आज मुंबई लोकलच्या मध्य (Central Railway) आणि हार्बर मार्गांवर (Harbour Railway) मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाण्याच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. तर हार्बरवर वाशी ते कुर्ला दरम्यान सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक आहे. तर पश्चिम रेल्वेकडूनही (Western Railway) माहीम ते सांताक्रूझ दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
विद्याविहार-ठाणे पाचवी आणि सहावी लाईन सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत
ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान डाउन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटं उशिरा पोहोचतील.
कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना त्यामुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
दरम्यान, मुंबई लोकल मार्गांवरील आजचा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.