Mumbai Local Megablock 26 May 2024: पश्चिम, मध्य अन् हार्बर रेल्वेवर 'मेगाब्लॉक'; मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी नक्की जाणून घ्या!
Mumbai Local Megablock 26 May 2024: मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी 26 मे 2026 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
![Mumbai Local Megablock 26 May 2024: पश्चिम, मध्य अन् हार्बर रेल्वेवर 'मेगाब्लॉक'; मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी नक्की जाणून घ्या! Mumbai Local Megablock 26 May 2024: Mumbai Local Megablock western line, central line, harbour line on 26 May 2024 Mumbai Local Megablock 26 May 2024: पश्चिम, मध्य अन् हार्बर रेल्वेवर 'मेगाब्लॉक'; मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी नक्की जाणून घ्या!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/25/3c0cdafaaf7d961fc7ea659273cd93fb1716618649091987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Local Megablock 26 May 2024: मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी 26 मे 2026 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वे-
- मुंबई विभाग २६.५.२०२४ (रविवार) रोजी खालीलप्रमाणे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक असणार आहे.
- सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीमा मार्ग
- सकाळी १०.१४ ते दुपारी ३.०९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि त्या विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकावर थांबणार नाहीत आणि पुढे ठाणे स्थानकांवर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील.
- सकाळी १०.२५ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि त्या नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावर थांबणार नाहीत आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील.
डाऊन धीमी मार्गिका:
ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५३ वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी कल्याण लोकल दुपारी ३.१८ वाजता सुटणार आहे.
अप धीमी मार्गिका:
- ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ९.५५ वाजता पोहोचेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी ३.२४ वाजता पोहोचेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
- सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत बंद राहतील.
- पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
हार्बर रेल्वे-
- डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०४ वाजता सुटेल.
- गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ०४.५१ वाजता सुटेल.
- ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.५६ वाजता वांद्रेसाठी सुटेल.
अप हार्बर मार्गावर:
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ०९.४० वाजता सुटेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.२८ वाजता सुटेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी ०४.५८ वाजता सुटेल.
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
पश्चिम रेल्वेत असा बदल
बोरिवली -गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १० त दुपारी ३ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या कालावधीत बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)