Mega Block : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
Mumbai Mega Block : मुंबईतील तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर लाईन आणि पश्चिम रेल्वेवर देखील ब्लॉक असेल.
मुंबई : मध्य रेल्वेकडून मेन लाईन आणि हार्बर लाईन तर पश्चिम रेल्वेनं देखील अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या कामासाठी 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेतला आहे. विविध अभियांत्रिकी, देखभाल व रेल्वेरुळांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी (ता. २५) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. मेन लाईनवर माटुंगा आणि मुलुंड जलद मार्गावर ब्लॉक असेल. तर हार्बर लाईनवर पनवेल वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल. बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
मेगाब्लॉकची सविस्तर माहिती :
मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा-मुलुंड जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत
परिणाम : सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. ठाणेहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
Attention Passengers! 🚨🚧
— Central Railway (@Central_Railway) August 24, 2024
Mega Block on UP and DOWN Fast Lines, Harbour line and trans-harbour lines on 25.08.2024 (Sunday).
Check the schedule for the first and last local trains before and after the block.
Plan your travel accordingly.#MegaBlock #SundayBlock pic.twitter.com/LjZUbiWMSM
हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
परिणाम : पनवेलहून सीएसएमटी येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटीहून पनवेल / बेलापूरकडे जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. याकाळात ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पश्चिम रेल्वे
कुठे : बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
परिणाम: ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या गाड्या गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येतील
रेल्वे रूळ, सिग्नल प्रणाली तथा ओव्हरहेड उपकरणांची देखभाल करण्यासाठी रविवार, 25 ऑगस्ट 2024, रोजी सकाळी 10:00 ते 15:00 या वेळेत बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. pic.twitter.com/6ihomkW3fW
— Western Railway (@WesternRly) August 24, 2024
दरम्यान, बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.ब्लॉक कालावधीत बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील. काही अप आणिडाऊन उपनगरीय सेवा रद्द राहतील. काही अंधेरी आणि बोरीवली गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवल्या जातील, ब्लॉक कालावधीत बोरीवली स्थानकावरील फलाट क्रमांक 01,02,03 आणि 04 वरून कोणत्याही गाड्या चालवल्या जाणार नाहीत
संबंधित बातम्या :