एक्स्प्लोर

मुंबईतील रायन स्कूलचीही पोलखोल, गेटसमोर दारुच्या बाटल्या

कांदिवलीच्या रायन स्कूलचं मुख्य प्रवेशद्वार सोडता इतरत्र कुठेही सुरक्षारक्षक नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे शाळेच्या कम्पाऊड वॉलवरुन कोणीही उडी मारुन शाळेच्या आवारात प्रवेश करु शकतं.

मुंबई : एकीकडे गुरुग्राममधल्या रायन स्कूलमध्ये सात वर्षांच्या प्रद्युम्नची हत्या झाल्यानं देशभर खळबळ उडाली आहे. तर मुंबईतल्या कांदिवलीमधील रायन स्कूलची दुरवस्थाही 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच दारुच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कांदिवलीच्या रायन स्कूलचं मुख्य प्रवेशद्वार सोडता इतरत्र कुठेही सुरक्षारक्षक नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे शाळेच्या कम्पाऊड वॉलवरुन कोणीही उडी मारुन शाळेच्या आवारात प्रवेश करु शकतं. याशिवाय स्कूल बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर्सना कायमस्वरुपी ठेवण्यात आलं नसून त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पालकांकडून मोठी फी उकळणारी रायन स्कूल विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी किती हलगर्जी बाळगते, हे या उदाहरणांवरुन आता उघड झालं आहे. गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी हरियाणा पोलिसांचं पथक तपासासाठी मुंबईत दाखल झालं आहे. रायन इंटरनॅशनल ग्रुपचं मुख्यालय मुंबईत असून ग्रुपचे सीईओ रायन पिंटो, व्यवस्थापकीय संचालक ग्रेसी पिंटो आणि अध्यक्ष ऑगस्टिन पिंटो यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीस

या तिघांनीही अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत शाळेचे समन्वयक जेईस आणि उत्तर विभागाचे प्रमुख फ्रान्सिस थॉमस यांना अटक करण्यात आली आहे. गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये 7 वर्षाच्या प्रद्युम्न ठाकूरची बस कंटडक्टरनं हत्या केली. खऱ्या मारेकऱ्यांना पकडलं नाही तर आत्महत्या करेन अशा इशारा प्रद्युम्नच्या आईनं दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget