एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पल्लवी पूरकायस्थच्या फरार मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या

काश्मिरातील पाकिस्तानच्या सीमेजवळ उरीमध्ये सज्जादचं गाव आहे. वर्षभरापासून पोलिस सज्जादचा शोध घेत होते.

मुंबई : मुंबईतील वकील तरुणी पल्लवी पूरकायस्थच्या हत्या प्रकरणातील फरार मारेकरीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुंबई क्राईम ब्रँचने श्रीनगरमध्ये कारवाई करुन दोषी सज्जाद मुगलला बेड्या ठोकल्या. जवळपास गेल्या दीड वर्षांपासून सज्जाद फरार होता. पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांचं अभिनंदन केलं. नाशिकच्या जेलमध्ये असताना फेब्रुवारी 2016 मध्ये सज्जादला पॅरोल मिळाला होता. आईच्या आजारपणाचं कारण पुढे करुन सज्जादने पॅरोल मिळवला. स्थानिक पोलिस स्टेशनला हजेरी लावण्याची अट त्याला घालण्यात आली होती. त्याचा पॅरोल मार्चमध्ये संपणार होता, मात्र त्याने तो वाढवून घेतला. त्यानंतर सज्जाद परागंदा झाला. मेमध्येही तो परत न आल्याने पोलिसांनी तक्रार दाखल केली. काश्मिरातील पाकिस्तानच्या सीमेजवळ उरीमध्ये सज्जादचं गाव आहे. वर्षभरापासून पोलिस सज्जादचा शोध घेत होते. अखेर जम्मू काश्मिर पोलिसांच्या सहकार्याने मंगळवारी श्रीनगर-लेह हायवेवर पोलिसांनी मुगलला अटक केली. 25 वर्षीय पल्लवी तिचा भावी जोडीदार अविक सेनगुप्तासोबत 16 व्या मजल्यावर राहत होती. 9 ऑगस्ट 2012 रोजी पल्लवीला तिच्या इमारतीचा सुरक्षारक्षक सज्जाद मुगलने जीवे मारलं होतं. मुंबईतल्या वडाळ्यामधील तिच्या राहत्या घरी रात्रीच्या वेळीत घुसून पल्लवीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र पल्लवीने केलेल्या विरोधामुळे त्याने तिची हत्या केली. 2014 मध्ये सेशन्स कोर्टाने सज्जादला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सज्जाद फरार झाल्यानंतर फडणवीसांनी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना पॅरोल न देण्याची शिफारस केली. पॅरोलचे दिवस 90 वरुन 46 वर आणण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Embed widget