एक्स्प्लोर

Mumbai Metro : मुंबईतील आदर्श नगर मेट्रो स्टेशनबाबत मोठी अपडेट; MMRDA ने हायकोर्टात दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Metro Latest News : जोगेश्वरी येथील आदर्श नगर मेट्रो स्टेशनच्या चौथ्या प्रवेशद्वाराबाबत एमएमआरडीएने महत्त्वाची माहिती हायकोर्टाला दिली.

मुंबई : जोगेश्वरी येथील आदर्श नगर मेट्रो स्टेशनच्या (Mumbai Metro) चौथ्या प्रवेशद्वाराचा प्रस्ताव सध्या रद्द करण्यात आला आहे, भविष्यात गरज पडल्यास त्याचा विचार करू अशी कबुली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दिली. त्यामुळे या मेट्रो स्टेशनला आता तीनच मुख्य प्रवेशद्वार राहणार आहेत.

आम्ही 2031 पर्यंत चौथ्या प्रवेशद्वाराचा प्रस्ताव पुढे ढकलत आहोत. प्रवाशांची संख्या बघून भविष्यात याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं एमएमआरडीएनं स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्यासमोर सरकारी वकील अक्षय शिंदे यांनी सोमवारी ही माहिती दिली. आदर्श नगर मेट्रो स्टेशनच्या चौथ्या प्रवेशद्वाराचा प्रस्ताव तूर्त रद्द करण्यात आला असल्याचं पत्रच सरकारी वकील अक्षय शिंदे यांनी हायकोर्टात सादर केलं.

काय आहे याचिका?

आदर्श नगर मेट्रो स्टेशनच्या चौथ्या प्रवेशद्वारासाठी तिथं असलेल्या रायगड मिलिटरी स्कूल ट्रस्टची जागा घेतली जागा घेतली जाणार आहे. त्याविरोधात ट्रस्टनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सोमवारी यासंदर्भात झालेल्या सुनावणीत ट्रस्टचे वकील हजर नव्हते. त्यामुळे ही सुनावणी तहकूब करण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने ही सुनावणी 25 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. पुढील सुनावणीत आम्ही एमएमआरडीएचं पत्र दाखल करुन घेत यावर ट्रस्टचं म्हणणं ऐकून घेऊ, असं हायकोर्टानं खंडपीठाने स्पष्ट केलं आहे. या याचिकेत म्हाडाकडून ॲड. प्रकाश लाड तर राज्य सरकारकडून ॲड. मिलिंद मोरे बाजू मांडत आहेत.

काय आहे प्रकरण?

मेट्रो 2-अ, दहिसर(पूर्व) ते डी.एन.नगर अशी मेट्रोची स्वतंत्र मार्गिका आहे. या मार्गिकेत जोगेश्वरीत आदर्श नगर मेट्रो स्टेशन आहे. या स्टेशनसाठी चौथ्या प्रवेशद्वाराचं नियोजन एमएमआरडीएनं केलेलं आहे. त्यासाठी येथील रायगड मिलिटरी स्कूल ट्रस्टच्या भूखंडावर हे प्रवेशद्वार प्रस्तावित आहे. हा भूखंड म्हाडानं यापूर्वीच ट्रस्टला दिलेला आहे. मात्र या चौथ्या प्रवेशद्वारासाठी या भूखंडाची 1179 चौ.मी. जागा घेतली जाणार आहे. याला ट्रस्टचा विरोध नाही, मात्र त्या बदल्यात ट्रस्टला टीडीआर आणि एफएसआय मिळण्याची प्रक्रिया नियमानुसार व्हावी, अशी ट्रस्टची मागणी आहे.

इतर महत्त्वाची बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णयSpecial Report Navyआयएनएस सुरत, नीलगिरी, वाघशीरचं कमिशनिंग; PM Modi यांच्या उपस्थितीत कमिशनिंग सोहळाBeed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Embed widget