एक्स्प्लोर

Mumbai Metro: आता कल्याण-डोंबिवलीवरुन थेट गाठता येणार नवी मुंबई; मेट्रो-12 मुळे तासांचा प्रवास मिनिटांत होणार शक्य

Mumbai Metro 12: मेट्रो 12 प्रकल्प नवी मुंबई मेट्रोला जोडण्यात येणार असल्याने कल्याण-डोंबिवली-तळोजा-नवी मुंबई प्रवास आता सुकर होणार आहे.

Kalyan-Taloja Mumbai Metro: कल्याण-डोंबिवलीवरुन नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवासांचा प्रवास आता सुकर होणार आहे. MMRDAने मेट्रो मार्गिकेबद्दल मोठी घोषणा केली आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होण्यासाठी मेट्रो 12 (Metro 12) आणि नवी मुंबई (Navi Mumbai) मेट्रो आता जोडण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रो जोडण्यासाठी मेट्रो 12 च्या डिझाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याणवरुन थेट नवी मुंबई गाठणं होणार शक्य

कल्याणमधून नवी मुंबईला प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता आरामदायी होणार आहे. या मार्गादरम्यान राहणाऱ्या प्रवाशांना MMRDAने मोठा दिलासा दिला आहे. दोन मेट्रो मार्गिका एकमेकांशी जोडल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. येत्या काही वर्षांत मेट्रो मार्गिकेचं काम पूर्ण होईल.

दोन मेट्रो मार्ग एकमेकांना जोडण्याचं काम सुरू

मेट्रो 12 ला नवी मुंबई मेट्रोशी जोडण्यासाठी मेट्रो 12च्या मार्गावर जवळपास 700 मीटरचा विस्तार करण्यात येणार आहे. हा मेट्रो मार्ग वाढवून MMRDA तळोजाजवळील मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रोला जोडण्याची योजना बनवत आहे. त्यानुसार, कल्याण ते तळोजा दरम्यान मेट्रो 12 कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. तर नवी मुंबईतील बेलापूर ते पेंढार दरम्यान मेट्रो कॉरिडॉर यापूर्वीच बांधण्यात आला आहे.

नव्याने काढणार निविदा

मेट्रो 12 कॉरिडॉरची पायाभरणी काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. 20.75 किलोमीटर लांबीच्या मेट्रो 12 प्रकल्पांचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी निविदा देखील मागवण्यात आल्या होत्या. सुमारे 5,865 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्प बांधकामासाठी अनेक कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते आणि निविदा दाखल केल्या होत्या. मात्र मेट्रो 12 मार्गिका नवी मुंबई मेट्रोला जोडण्याच्या प्रस्तावामुळे पुर्वीच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे एमएमआरडीएला पुर्वीची निविदा रद्द करावी लागली. एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या नवीन डिझाइनसह नवीन निविदा लवकरच काढण्यात येईल.

कल्याणवरुन नवी मुंबईला प्रवास करणाऱ्यांना होणार फायदा

आजच्या घडीला कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नवी मुंबईत येण्यासाठी रेल्वे किंवा रस्तेमार्ग हा एकच पर्याय आहे. कल्याणवरुन लोकलने नवी मुंबईत यायचे झाल्यास प्रथम ठाण्याला यावे लागते आणि तिथून ट्रेन बदलून नवी मुंबईला जाता येते. तर, रस्ते मार्गाने यायचे झाल्यास किमान एक-दीड तासांचा वेळ लागतो. त्यामुळे हे दोन्ही मेट्रो मार्ग जोडल्याने तासांचा प्रवास अगदी काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. 

मेट्रो 12 मेट्रो 5 कॉरिडॉरला जोडणार

दुसरीकडे, ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान प्रस्तावित मेट्रो 5 कॉरिडॉरलाही मेट्रो 12 जोडण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, तळोजा, बेलापूर आणि नवी मुंबईदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा वेळखाऊ आणि वेदनादायी प्रवास भविष्यात सुखकर होणार आहे.

हेही वाचा:

Irshalwadi Landslide : प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट असलेल्या इर्शाळगडावर दरड कोसळली; पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget