एक्स्प्लोर

Mumbai Airport : मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी देण्याऱ्या तरुणाला त्रिवेंद्रममधून घेतलं ताब्यात, ATS ची मोठी कारवाई 

Mumbai Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवण्याची धमकी देणाऱ्या युवकाला एटीएसने त्रिवेंद्रममधून ताब्यात घेतलं असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai Airport) अर्थातच टर्मिनल 2 उडवण्याची धमकी देणारा मेल आल्याची माहिती समोर आली.  याप्रकरणात धमकी देणाऱ्या युवकाला एटीएसने त्रिवेंद्रममधून ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आलीये. या संदर्भात अधिक तपास सध्या सुरु आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा मेल आला होता. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. 

स्फोट टाळण्यासाठी 48 तासांत 10 लाख डॉलरची मागणी या मेलद्वारे करण्यात आली होती. बिटकॉइनमध्ये या युवकाने पैशांची मागणी केली होती. मुंबईच्या सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 385 आणि 505 (1) (बी) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) टर्मिनल 2 वर गुरुवारी बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला आणि एअरपोर्ट प्रशासनाची झोप उडाली. सूत्रांनी सांगितलं की, हा धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीनं हा स्फोट टाळण्यासाठी 48 तासांच्या आत एक दशलक्ष डॉलर्स भरण्याची मागणी केली आहे, तेही बिटकॉइनमध्ये. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, सहारा पोलिसांनी या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं quaidacasrol@gmail.com हा ईमेल आयडी वापरुन धमकीचा ईमेल पाठवला आहे. 

धमकीचा ईमेल आल्यानंतर तात्काळ मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मुंबई पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं गुरुवारी सकाळी 11 वाजून 6 मिनिटांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या फीडबॅक इनबॉक्समध्ये हा ईमेल पाठवला होता.

आरोपीनं धमकीच्या ईमेलमध्ये लिहिलं होतं की, "तुमच्या विमानतळासाठी हा अंतिम इशारा आहे. असं न झाल्यास, आम्ही विमानतळाच्या टर्मिनल 2 वर 48 तासांच्या आत बॉम्बस्फोट करू, अन्यथा आम्हाला बिटकॉइनमध्ये एक दशलक्ष डॉलर्स पाठवले जातील आणि 24 तासांनंतर दुसरा इशारा दिला जाईल.

हेही वाचा : 

Beed Crime News : बा विठ्ठला काय रे हे! एकादशी दिवशी भाजी भाकरीऐवजी साबुदाण्याची खिचडी केली, संतापलेल्या नातवाने आजीला संपवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget