एक्स्प्लोर
मेट्रोसाठी झाडांची कत्तल कराल तर खबरदार : मुंबई हायकोर्ट
मुंबई : मुंबईतील मेट्रो 3 प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यास हायकोर्टानं तीव्र शब्दात मनाई केली आहे. त्यामुळे सीप्झ ते कुलाबा मेट्रो 3 प्रकल्प अडचणीत आला आहे. मेट्रोसाठी वृक्षतोड कराल तर खबरदार अशा शब्दात हायकोर्टानं एमएमआरडीए आणि बीएमसीला फटकारलं आहे.
मुंबईत मेट्रो 3 प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. सीप्झ ते कुलाबा असा मेट्रो 3 चा मार्ग आहे. या प्रकल्पासाठी चर्चगेट परिसरातील जवळपास 5 हजार झाडांची कत्तल करण्यात येणार होती. मात्र चर्चगेट परिसरातील स्थानिक नागरिकांनी या वृक्षतोडीला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
आज या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली, यावेळी "मेट्रो प्रकल्पासाठी एकाही झाडाला हात लावाल तर खबरदार" अशा शब्दात एमएमआरडीए आणि बीएमसीला खडे बोल सुनावले आहेत. कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही, अशी हमी हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना दिली.
दरम्यान आपली बाजू मांडताना प्रशासनानं ही झाडे दुसरीकडे लावली जातील असं हायकोर्टात सांगितलं. यावर झाडं दुसरीकडे लावल्यावर इथल्या लोकांनी श्वास घ्यायला दुसरीकडे जायचं का? असा सवाल करत हायकोर्टानं उद्या शुक्रवारपर्यंत सुनावणी स्थगित केली.
संबंधित बातम्या :
मेट्रो 3 विरोधात वेंगसरकरांची बॅटिंग, आझाद मैदानातील मार्गाला विरोध
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement