एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई विमानतळाजवळील टोलेजंग इमारतींची उंची मोजा : हायकोर्ट
मुंबई : मुंबईतल्या दोन्ही विमानतळांजवळील उंच इमारतींवर गदा येण्याची शक्यता आहे. एअरपोर्टवरील धावपट्टीपासून 4 किलोमीटरच्या परिघातील टोलेजंग इमारतींची उंची मोजण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.
या इमारतींवरील पोल्स आणि एँटिना निर्धारित उंचीपेक्षा जास्त उंच असतील तर ते तात्काळ पाडण्यात यावेत असं कोर्टानं सांगितलं आहे. त्यासाठी या परिघातील 112 धोकादायक इमारतींना नोटिसा पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, हायकोर्टाच्या आदेशानुसार या परिसरातील सुनिता इमारतीवर कारवाई सुरु केल्याचा दावा पालिकेनं केला आहे. विमानतळाच्या धावपट्टीपासून जवळच्या उंच इमारतींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका अॅड. यशवंत शेणॉय यांनी दाखल केली होती. त्यावर ही सुनावणी करण्यात आली.
मुंबई विमानतळाजवळची 'ती' इमारत तोडा, हायकोर्टाचे आदेश
विमानतळाच्या परिसरात उंच इमारतींमुळे विमानसेवेत बाधा येत असल्याने त्यावर कारवाई करण्याबाबत नागरी हवाई वाहतूक प्राधिकरण आणि मुंबई विमानतळ प्राधिकरणानं अशा विकासकांना 2012 पासून 100 पेक्षा जास्त नोटीसेस पाठवल्या आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
भंडारा
Advertisement