एक्स्प्लोर
Advertisement
काळाघोडा फेस्टिव्हलच्या आयोजकांना मुंबई हायकोर्टाचा दणका
महोत्सवात उद्या म्हणजे शनिवारी जगविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध 'काळाघोडा फेस्टिव्हल'च्या आयोजकांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. सार्वजनिक जागेवर फुकटात कार्यक्रमाला परवानगी दिल्यामुळे कोर्टाने फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
मुंबईतील चर्चगेट स्टेशनसमोरील क्रॉस मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनावर मुंबई हायकोर्टाने तूर्तास बंदी घातली आहे. 3 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत काळाघोडा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवात उद्या म्हणजे शनिवारी जगविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मात्र काळाघोडा फेस्टिव्हलसाठी सार्वजनिक जागेवर फुकटात कार्यक्रम घेण्याची परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारवर हायकोर्टाने ताशेरे ओढले. त्यामुळे तूर्तास या ठिकाणी कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement