एक्स्प्लोर

भेंडी बाजारातील धोकादायक जीर्ण इमारतींवर कारवाई का केली नाही? : हायकोर्ट

कोरोना आणि त्यात सध्या टाळेबंदीमुळे कर्मचाऱ्याची कमतरता असून टाळेबंदीचे आणखीन निर्बंध शिथिल झाल्यानंतरच या इमारतीवर कारवाई केली जाईल असं म्हाडाकडून कोर्टात सांगण्यात आले आहे.

मुंबई : मॉन्सून दरम्यान मुंबईत जीर्ण इमारती कोसळण्याचा मोठा धोका असतो. त्यात संपत्तीचे नुकसान तर होते मात्र निरपराध लोकांचे प्राणही जातात. असे असतानाही मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाने भेंडी बाजार येथील धोकादायक जीर्ण इमारती पाडण्याची कारावाई का केली नाही?, असा सवाल उपस्थित करत केला आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडा आणि पालिका प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. भेंडी बाजार परिसरातील हाजी इस्माईल मुसाफिरखाना ही इमारत धोकादायक असूनही या इमारतीचे पाडकाम अद्याप करण्यात आलेले नाही. त्याविरोधात सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) आणि इतर भाडेकरूंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडली. तेव्हा, पावसाळा जवळ आला असून या मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे. मात्र या इमारतीत तळमजल्यावर मस्जिद असून ती वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचे इमातीतील दुसऱ्या गटाकडून कोर्टात सांगण्यात आले. कोरोना आणि त्यात सध्या टाळेबंदीमुळे कर्मचाऱ्याची कमतरता असून टाळेबंदीचे आणखीन निर्बंध शिथिल झाल्यानंतरच या इमारतीवर कारवाई केली जाईल असं म्हाडाकडून कोर्टात सांगण्यात आले आहे. मात्र प्रशासनाची बाजू ही अप्रासंगिक आहे. तिथं मशिद आहे किंवा सदर जागा ही वक्फची मालमत्ता आहे हे महत्वाचे नसून सार्वजनिक सुरक्षितता अधिक महत्वाची आहे. तसेच पावसाळ्यात गर्दीच्या ठिकाणी जीर्ण इमारती कोसळण्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत त्यात निरपराध लोकांचे आणि संपत्तीचे नुकसान झाल्याचंही न्यायालयाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पालिका आणि म्हाडा प्रशासनाकडे पुरेसे अधिकारी असताना त्याचा वापर करत या इमारतीतील लोकांना हटवण्यासाठी तसेच इमारत पाडण्याची कारवाई का केली नाही?, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत हायकोर्टानं म्हाडा आणि पालिका प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी 12 जून पर्यंत तहकूब केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget