एक्स्प्लोर

Mumbai HC : वयाच्या 45 नंतर अनुकंपा नोकरी देता येणार नाही, मॅटनं नियमबाह्य निकाल देऊ नये; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

Mumbai High Court Dismiss MAT Order : मुंबई उच्च न्यायालयाकडून कोल्हापूरच्या प्रकरणात मॅटनं दिलेला आदेश रद्द करण्यात आला आहे. 

मुंबई: अनुकंपा तत्वावरील नोकरी वयाच्या 45 नंतर देता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) नुकताच एका निकालात दिला आहे. एका महिलेला दया दाखवून 45 वयानंतरही अनुकंपा तत्त्वाचा लाभ दिला तर वय उलटून गेलेल्या दावेदारांची नोकरीसाठी रांग लागेल, असं हायकोर्टानं या निकालात नमूद केलं आहे.

महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणानं (MAT) एका महिलेचं नाव अनुकंपा नोकरीच्या प्रतिक्षा यादीत समाविष्ट करण्याचे आदेश दिले होते. मात्र या महिलेचं वय हे 45 पेक्षा अधिक झालेलं होतं. त्यामुळे तिचं नाव प्रतिक्षा यादीतून वगळण्यात आलं, मात्र तरीही मॅटनं तिचं नाव पुन्हा प्रतिक्षा यादीत टाकण्यास सांगितलं होतं. याविरोधात प्रशासनानं हायकोर्टात दाद मागताच मॅटचे हे आदेश हायकोर्टानं रद्द केले आहेत.

काय आहे प्रकरण?

सुवर्णा शिंदे यांचे पती संजय हे कोल्हापूरात तलाठी होते. 10 ऑक्टोबर 2011 रोजी संजय यांचे निधन झाले. त्यानंतर सुवर्णा यांनी अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला. त्यांचं नाव प्रतिक्षा यादीत होतं. मात्र यादरम्यान सुवर्णा यांनी वयाची 45 वर्षे पार केल्यानं 7 मे 2011 रोजी त्यांचं नाव प्रतिक्षा यादीतून वगळण्यात आलं. त्याविरोधात त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. तेव्हा मॅटनं त्यांचं नाव पुन्हा प्रतिक्षा यादीत टाकण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

हायकोर्टाचा निकाल काय? 

अनुकंपा नोकरी देताना नियम डावलता येणार नाहीत. अनुकंपा नोकरीसाठी पात्रतेचं वय हे 18 ते 45 वर्षांपर्यंतच आहे. त्यानंतर अनुकंपा नोकरी देता येत नाही असा राज्य सरकारचा नियमच आहे. हा नियम मॅटनं रद्द केलेला नाही तसेच तो रद्द करावा, असं ठोस कारण नाही. केवळ दया दाखवून एखाद्या प्रकरणात नियमांत सवलत देता येणार नाही, असं हायकोर्टानं आपल्या निकालात नमूद केलं. अनुकंपा नोकरी देण्यासाठी राज्य शासनानं धोरण निश्चित केलेलं आहे. या नियमांचं काटेकोरपणे पालन करा, असं वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयानंही सांगितलेलं आहे. असं असताना नियमांचं उल्लंघन करून मॅटनं अनुकंपाचा नोकरीचा एखाद्याला नियमबाह्य लाभ देणे अयोग्य आहे, असा ठपका हायकोर्टानं ठेवला आहे.

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Chaityabhumi Protest : चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली; आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली; आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक बंद 
मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक बंद 
CJP Protest : मुलाला आईसह पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुलाने टाहो फोडला; मुंबईत आंदोलकांवर लाठीचार्ज 
मुलाला आईसह पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुलाने टाहो फोडला; मुंबईत आंदोलकांवर लाठीचार्ज 
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Embed widget