एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा नोंदवा, हायकोर्टाचे निर्देश

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पुढारी आणि सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल का होत नाहीत?, गुन्हे दाखल करण्यापासून पोलिसांना कोण रोखतंय? असा सवाल करीत गेल्या सुनावणीला हायकोर्टानं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपयुक्तांना जाब विचारला होता.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील सुमारे 25 हजार कोटी रूपयांच्या गैरव्यवहारमध्ये बड्या राजकीय नेत्यांना गैरप्रकारे आर्थिक लाभ दिल्याच्या प्रकरणात पुढील पाच दिवसांत गुन्हा दाखल करा असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. याप्रकरणी दाखल झालेल्या आरोपांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे असं स्पष्ट करत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठानं राखून ठेवलेला आपला अंतिम निकाल गुरूवारी जाहीर केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या नेत्यांवर या घोटाळ्याचा आरोप करणारी जनहित याचिका सुरिंदर अरोरा यांनी दाखल केली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पुढारी आणि सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल का होत नाहीत?, गुन्हे दाखल करण्यापासून पोलिसांना कोण रोखतंय? असा सवाल करीत गेल्या सुनावणीला हायकोर्टानं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपयुक्तांना जाब विचारला होता. काय आहे प्रकरण - साल 1961 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी काही सूत गिरणी आणि साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे वाटली. या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेचे प्रचंड नुकसान होऊन ती डबघाईत गेली आहे. या संचालक मंडळामध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण अशा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा तर शिवसेनेच्या आनंदराव अडसुळांचाही समावेश आहे. याप्रकरणी सुरींदर अरोरा यांनी साल 2015 मध्ये तक्रार दाखल करत हायकोर्टात अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी याचिकेमार्फत केली आहे.  संचालक मंडळावर असलेले  सर्वपक्षीय महत्वाचे नेते माणिकराव पाटील निलेश बाळासाहेब नाईक विजयसिंह मोहिते पाटील अजित पवार दिलीपराव देशमुख राजेंद्र शिंगणे मदन पाटील हसन मुश्रीफ मधुकरराव चव्हाण दिलीप सोपल अमरसिंह पंडीत सदाशिवराव मंडलीक यशंवतराव गडाख प्रसाद तनपुरे तानाजी चोरगे मिनाक्षी पाटील पृथ्वीराज  देशमुख आनंदराव अडसूळ संतोशकुमार कोरपे जयंत पाटील देवीदास पिंगळे जयंतराव आवळे कै. पांडुरंग फुंडकर ईश्वरलाल जैन राजन तेली अमरसिंह पंडीत शेखर निकम गंगाधर कुंटुरकर 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Haryana Election Result : हरियाणात भाजपची  हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोषSupriya Sule on Haryana : हरियाणात भाजपची आघाडी; सुळे म्हणाल्या 4 पर्यंत थांबा ABP MAJHAJammu Kashmir Election : जम्मू-काश्मिरच्या निवडणुकीत फुटीरतावादी नेत्यांना मतदान? खास चर्चाABP Majha Headlines : 04 PM : 06 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
Haryana Election: काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
Haryana Election Results 2024 : हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
मुलगी शिकली प्रगती झाली,पण काम नाही म्हणून 1500 देऊन घरी बसवली; ठाकरेंचा घणाघात
मुलगी शिकली प्रगती झाली,पण काम नाही म्हणून 1500 देऊन घरी बसवली; ठाकरेंचा घणाघात
Embed widget