सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट समाजात तेढ निर्माण करणारीच असते असं नाही : हायकोर्ट
WhatsApp Viral Message : व्हॉटस् अॅप ग्रुपवरील मेसेज व्हायरल झाल्यास केवळ तो टाकणाराच नाही तर ग्रुपमधील प्रत्येकजण तितकाच दोषी असल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं.
![सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट समाजात तेढ निर्माण करणारीच असते असं नाही : हायकोर्ट mumbai high court on social media whatsapp viral message and group marathi news सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट समाजात तेढ निर्माण करणारीच असते असं नाही : हायकोर्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/27/51246709af668a525dd837bdc85f99a2172745147404193_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : व्हॉटस् अॅप ग्रुपवरील मेसेज व्हायरल झाल्यास केवळ तो टाकणाराच दोषी असू शकत नाही. तर ग्रुपमधील प्रत्येकाला यासाठी दोषी धरायला हवं. अशा प्रकरणांत पोलीस मनमानीपणे कारवाई करु शकत नाहीत, असं मत हायकोर्टानं एका निकालात व्यक्त केलंय.
आज प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहेत. व्हॉटस् अॅपसह अन्य सोशल मीडिया प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहेत. मात्र प्रत्येकजण तितका टेक्नोसेव्ही नसतो, त्यामुळे येणारा प्रत्येक मेसेज फॉरवर्ड करणं कधीतरी अंगलट येऊ शकतं. मात्र याचा अर्थ सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट समाजात तेढ निर्माण करणारी असते असा होत नाही, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय. व्हॉटस् अॅपवर येणारे मेसेज, व्हिडिओ, फोटो, रिलस् तात्काळ फॉरवर्ड करण्यात लोकांना मजा येते. पण बहुतांशवेळा हे मेसेज फॉरवर्ड करण्याआधी तो नीट बघितलाही जात नाही, ही वृत्ती लोकांनी बदलायला हवी. असं निरीक्षण नोंदवत औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांनी आक्षेपार्ह व्हॉटस् अॅप मेसेज फॉरवर्ड केल्याबद्दल दाखल गुन्हा रद्द केला आहे.
काय आहे प्रकरण?
औरंगाबाद येथील ज्ञानेश्वर वाकळे यांनी त्यांच्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतचा एक आक्षेपार्ह मेसेज व्हॉटस् अॅप ग्रुपवर फॉरवर्ड केल्याचा वाकळे यांच्यावर आरोप होता. सामाजिक भावना दुखावत समाजात तेढ निर्माण केल्याचा गुन्हा वाकळे यांच्याविरोधात नोंदवण्यात आला होता.
वाकळेंनी मेसेज टाकल्यानंतर अन्य ग्रुप सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. मात्र तो मेसेज डिलिट करण्याऐवजी वाकळे त्या ग्रुपमधून बाहेर पडले. त्यांना पुन्हा ग्रुपमध्ये घेण्यात आलं मात्र ते आधीचा मेसेज डिलिट करु शकत नव्हते. वाकळे यांच्या मेसेजवर ग्रुप अॅडमिनने माफी मागितली होती. तसेच असे मेसेज ग्रुपवर टाकू नका, असंही अॅडमिननं सर्वांना सांगितलं. याचा अर्थ आक्षेपार्ह मेसेज फॉरवर्ड करण्याचा कोणाचा हेतूू नव्हता, असं न्यायालयानं आपल्या निकालत स्पष्ट केलं.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)