(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai : श्रीमंत मुंबईत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधांची प्रचंड दुरावस्था का?
Mumbai Health Update: महानगरपालिकेचे (BMC) एक प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र (Health Center) असायला पाहिजे असा निकष आहे. मात्र मुंबईत हे प्रत्यक्षात नाही.
मुंबई : मुंबईत 15 हजार लोकसंख्येमागे महानगरपालिकेचे (BMC) एक प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र (Health Center) असायला पाहिजे असा निकष आहे. मात्र मुंबईत हे प्रत्यक्षात नाही. तसेच पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे पावसाळ्याशी संबंधित आजारही मुंबईत वाढलेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र हे मोठे आधार असते. मात्र मुंबईत पायाभूत सुविधांची केंद्राची ही दुरवस्था आहे अशी परिस्थिती आहे. आम आदमी पक्षाने मुंबईतील सर्व महापालिका आरोग्य सेवा केंद्राची पाहणी करत ही परिस्थिती समोर आणत या परिस्थितीला नक्की कोण जबाबदार आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.
सुविधांसाठी महापलिकेचं 693 कोटींचे बजेट
मुंबई महानगरपालिकेत आरोग्य सेवा केंद्राच्या पायाभूत सुविधांसाठी 6933 कोटींचे बजेट आहे, ज्या शहरात 700 मनपाचे दवाखाने असले पाहिजेत, त्या शहरात केवळ 189 दवाखाने आहेत. मुंबई महानगरपालिका आपल्या बजेटच्या 15 % आरोग्यसेवा पायाभूत सुविधांवर खर्च करते.
मुंबईतील आरोग्य केंद्रात काय परिस्थिती ?
आपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील 10 महापालिका दवाखान्यांना भेटी दिली असताना त्यांची अवस्था दयनीय असल्याचे दिसून आले. या आरोग्य केंद्रांमध्ये एकही रुग्ण नाही, डॉक्टर नाहीत, परंतु त्याजागी कुत्र्यांचा वावर दिसला. तसेच हे आरोग्य केंद्र धुळखात पडलेला आहे. मुंबईत 189 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. नियमानुसार पंधरा हजार लोकसंख्येच्या मागे एक दवाखाना हवाय मात्र कमी प्रमाणात आरोग्य केंद्र मुंबईत पाहायला मिळतात.
याला नक्की जबाबदार कोण आहे?
महानगरपालिका करोडो रुपये प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रसाठी खर्च करते तरी देखील आरोग्य सेवा केंद्रची दयनीय अवस्था झाली असल्याचे चित्र मुंबईत आहे. या अवस्थेला नक्की कोण जबाबदार आहे? सत्तेत असलेली शिवसेना की पालिका अधिकारी? असा प्रश्न आम आदमी पार्टीचे मुंबई प्रभारी अंकुश नारंग यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईला आरोग्य सेवा मॉडेलची आवश्यकता
मुंबई महानरपालिकेत 25 वर्षांहून अधिक काळ सत्तेत असूनही शिवसेना मुंबईकरांना मूलभूत सुविधा देऊ शकत नाही, हे धक्कादायक आहे असे आपचे मुंबई प्रभारी अंकुश नारंग म्हणतात. गेल्या 8 वर्षांत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकचे जागतिक मॉडेल बनवले आहे, ज्याचे अनुसरण केले सर्वत्र केले जात आहे. मुंबईतील ही परिस्थिती पाहता स्पष्ट आहे की मुंबईला आरोग्य सेवा मॉडेलची आवश्यकता आहे, येणाऱ्या सत्ताधारी पक्षाने आणि प्रशासनाने ते राबवणे अत्यंत गरजेचे आहे नारंग सांगतात.