एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत तरुणाला लुटून फेरीवाल्यांचा चाकूहल्ला
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इमारतीच्या सुरक्षारक्षकाने "इधर मत गिर भाई बिल्डिंगके बाहर जा" म्हणत जखमी तरुणाला इमारतीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ एका तरुणाला लुटून चाकूहल्ला करण्यात आला. हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. पहाटे पाच वाजता घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या खोत लेनमध्ये अंधाराचा फायदा घेत दोघांनी लुटण्याच्या उद्देशाने तरुणावर चाकू हल्ला केला. यामध्ये सागर सुरेश हिवरकर गंभीर जखमी झाला. हल्लेखोर आरोपी सलमान ताहीर शहा आणि समीर खलील अहमद सिद्धीकी हे दोघे याच खोत लेनमध्ये टोमॅटो विक्री करतात.
सागर शनिवारी सकाळी कामावर जायला चालत निघाला होता. आरोपींनी त्याला लुटण्याच्या उद्देशाने अडवलं. त्याची बॅग, मोबाईल आणि पाकीट काढून घेतलं. मात्र त्याने विरोध करताच त्याच्या पोट आणि हातावर चाकूने वार केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरच्या मदतीला कोणीच धावून आलं नाही. इतकंच काय पण जखमी सागरला सागर बोनान्झा इमारतीच्या सुरक्षारक्षकाने "इधर मत गिर भाई बिल्डिंगके बाहर जा" म्हणत इमारतीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
सध्या सागरवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फेरीवाल्यांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे घाटकोपरमध्ये नाराजी पसरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
भविष्य
Advertisement