एक्स्प्लोर
जगात सर्वात महागड्या शहरात मुंबई 21 व्या क्रमांकावर

मुंबई : जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबईचा 21 क्रमांक लागला आहे. नाईट फ्रँक वेल्थ अहवालानुसार मुंबईनं टोरंटो, वॉशिंग्टन डीसी आणि मॉस्को सारख्या जगभरातील प्रसिद्ध शहरांनाही मागे टाकलं आहे. दिल्लीनं बँकॉक, सिएटल, जकार्ता या शहरांवर मात करत 35 वा क्रमांक पटकावला आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकसंख्या असलेल्या 89 देशांतील 125 शहरांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यानुसार गेल्या दशकभरात भारतात 290 टक्क्यांनी अतिश्रीमंतांची वाढ झाल्याचं दिसून आलं. भविष्यातील संपत्तीधारकांच्या यादीत यादीत मुंबईचा 11 वा क्रमांक लागतो. या यादीतही मुंबईने शिकागो, सिडनी, पॅरिस, सेओल, दुबई यांना मागे टाकलं आहे. सर्वात महागड्या मुख्य निवासी (प्राईम रेसिडेंशियल) शहरांमध्ये मुंबई 15 व्या स्थानी आहे. काय आहे नाईट फ्रँक वेल्थ रिपोर्ट ? जगातल्या 89 देशांतील 125 शहरांचा अभ्यास 200 कोटींहूनही अधिक संपत्ती असलेल्या लोकांची नोंद भारतातील सर्वाधिक 1340 श्रीमंत मुंबईत दिल्लीत 680, कोलकात्यात 280, हैदराबादेत 260 श्रीमंत जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई 21 व्या स्थानी भारतातील अतिश्रीमंतांचा सिंगापूर, युके, युएई, युएस आणि हाँगकाँगमध्ये घर घेण्याकडे कल 2015 पासून पुणे, हैदराबाद, बंगळुरु आणि मुंबईत अतिश्रीमंतांची वाढती संख्या
आणखी वाचा























