एक्स्प्लोर

चोरीला गेलेला मोबाईल तिने स्वतःच ट्रॅक करुन शोधला!

मुंबईतील एका तरुणीने स्वतःच दुसऱ्या फोनवर मोबाईल ट्रॅक केला आणि आपला मोबाईलचोर शोधून काढला.

मुंबई : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तुम्ही काय कराल? पोलिसात जाऊन एनसी दाखल कराल, मात्र फोन परत मिळेल याची खात्री तुम्हाला नसेलच. कारण अनेक कामं अडल्यामुळे दुसऱ्याच दिवशी तुम्ही नवीन मोबाईल विकत घ्याल. मात्र मुंबईतील एका तरुणीने स्वतःच आपला मोबाईलचोर शोधून काढला. आपला हरवलेला मोबाईल पोलिस नाही, तर आपण स्वतःच शोधू शकतो यावर तुमचा विश्वास बसतो का? निदान तसा प्रयत्न तर आपण नक्कीच करु शकतो. मुंबईतील मरोळ भागात राहणाऱ्या झीनतने हा प्रयत्न केला आणि तिला तिचा मोबाईल मिळाला. मोबाईल चोर शहर सोडून बाहेरगावी पलायन करणारच होता, तितक्यात आरपीएफने त्याला जेरबंद करुन दादर जीआरपी चौकीकडे सोपवलं. 32 वर्षी सेल्वाराज शेट्टी याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कसा शोधला फोन? 19 वर्षांची झीनत बानो हक एका शाळेत शिक्षिका आहे. गेल्या रविवारी ती कामानिमित्त मालाडला गेली होती. घरी परत येताना आपला अँड्रॉईड फोन हरवल्याचं तिच्या लक्षात आलं. मात्र फोन नेमका कसा, कुठे चोरीला गेला, हे तिच्या ध्यानात येत नव्हतं. झीनतने आपल्या दुसऱ्या अँड्रॉईड फोनवरुन गुगल अकाऊण्ट लॉगइन केलं. त्यावरुन तिने हरवलेल्या फोनची अॅक्टिव्हिटी ट्रॅक केली. मोबाईलमध्ये असलेल्या 'माय अॅक्टिव्हिटी' या ऑप्शनमधून तुम्ही आपल्या अकाऊण्टमध्ये लॉगइन करुन दुसऱ्या मोबाईलवर पाहिले गेलेले व्हिडिओ, वेबसाईट आणि इतर सर्चबद्दल माहिती घेऊ शकतं. चोराने रजनीकांतचा काला चित्रपटातील गाणी सर्च केली. त्यानंतर शेअर इट अॅप वापरलं. व्हॉट्सअॅप, फेसबुक ही अॅपही अपडेट केली. त्यानंतर चोराने रेल्वे तिकीट बुकिंग अॅप डाऊनलोड केलं. चोराने  दादर-तिरुवंतमलई रेल्वे तिकीट बुक केलं आणि त्याचा स्क्रीनशॉट घेतला. विशेष म्हणजे चोराने स्वतःचाही फोटो मोबाईलवर क्लिक केला. गुगल फोटोजमधून झीनतने चोराचा फोटो आणि रेल्वे तिकीटाचे तपशील मिळवले. पुद्दुचेरी एक्स्प्रेस रविवारी रात्री 9.30 वाजता दादरवरुन निघत असल्याचं तिला समजलं. झीनतने दादर स्टेशन गाठून जीआरपींना ही माहिती दिली. ट्रेन येताच आरपीएफ संबंधित सीट नंबरवर गेले, तिथे आलेल्या व्यक्तीकडे झीनतचा चोरीला गेलेला फोन सापडला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 27 September 2024 : ABP MajhaHasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Embed widget