एक्स्प्लोर

जिनिअस बॉयला अब्जांची आकडेमोड ते 500 वर्षांचं कॅलेंडर तोंडपाठ

जीनांशच्या बोटांच्या वेगापेक्षा त्याच्या बुद्धीचा वेग अधिक आहे. अबॅकस असो, क्युब असो की 500 वर्षांचं कॅलेंडर...

मुंबई : पुढच्या महिन्यात एखाद्या तारखेला कोणता वार येतो, हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण लगेच कॅलेंडर शोधतो. किंवा दोन अंकी आकड्यांची बेरीज वजाबाकी करायची असेल, तरीही आपल्याला लगेच कॅलक्युलेटर लागतो.  मात्र ही सगळी आकडेमोड चुटकीसरशी करणाऱ्या मुंबईतील एका जिनियस चिमुरड्याने आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लॅपटॉपवर सुपरफास्ट टायपिंग करत अब्जावधींची गणितं सोडवणारा जीनांश देढिया. वय अवघं 6 वर्ष... साध्या बोटांवर बेरीज करतानाही जिथे भल्याभल्यांच्या तोंडाला फेस येतो, तिथे हा चिमुकला कॅलक्युलेटरलाही मागे टाकतो. सहा वर्षांच्या जीनांशच्या विक्रमांचा डंका जगभर वाजत आहे. तुम्ही कोणतीही तारीख सांगा... जीनांश तुम्हाला तब्बल 500 वर्षांच्या कॅलेंडरची इत्यंभूत माहिती देतो. त्यामुळेच तुर्कीमध्ये पार पडलेल्या मेंटल कॅलक्युलेशन स्पर्धेत त्यानं 32 वर्षीय व्यक्तीचा रेकॉर्ड ब्रेक केला. जीनांशच्या बोटांच्या वेगापेक्षा त्याच्या बुद्धीचा वेग अधिक आहे. अबॅकस असो, क्युब असो की 500 वर्षांचं कॅलेंडर... जीनांशला सगळंच अगदी तोंडपाठ आहे... मुलांना शिक्षणासोबतच अभ्यासाला पूरक असणारं असं प्रशिक्षण दिलं तर मुलं त्यामध्ये रमतात आणि त्यांचं शिक्षण रटाळ न होता आनंददायी होतं. बुद्धी प्रत्येकाला असते, गरज आहे ती फक्त प्रशिक्षणाची... मग आपण आपल्याही घरात असाच जीनांश घडवू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai BMC Tabs: मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget