एक्स्प्लोर
जुहू चौपाटीवर चार मित्र बुडाले, एकाला वाचवण्यात यश
पाच मित्रांपैकी एकाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून चौघं जण बेपत्ता आहेत.

प्रातिनिधीक फोटो
मुंबई : मुंबईतील जुहू चौपाटीवर पोहण्यासाठी गेलेले चार मित्र बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पाच मित्रांपैकी एकाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून चौघं जण बेपत्ता आहेत. 17 ते 22 वर्ष वयोगटातील पाच मित्र संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास पोहायला गेले होते. मात्र समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यातील चौघे जण बुडाले. गोदरेज चौपाटी आणि गांधीग्राम चौपाटीच्या मधल्या भागात ही घटना घडली. फरदिन सौदागर (17), सोहेल शकील खान (17), फैसल शेख (17), नाझीर गाझी (17) आणि वसीम सलीम खान (22) अशी पाच जणांची नावे आहेत. सर्वजण अंधेरीतील डी. एन. नगर भागात राहणारे आहेत. यापैकी वसीम खानला सुरक्षारक्षकांनी वाचवलं असून अन्य चौघांचा शोध सुरु आहे.
आणखी वाचा























