(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई पूल दुर्घटना : 'लोकांनी व्हिडीओ बनवण्याऐवजी मदत केली असती तर माझा भाऊ वाचला असता'
मुंबईतल्या सीएसएमटी स्थानकाजवळी पादचारी पुलाचा 60 टक्के भार गुरुवारी (14 मार्च) रात्री 7.20 च्या सुमारास कोसळला. या दुर्घेटनेत सहा जणांचा मृत्यू झालाय तर 31 जण जखमी झाले आहेत.
पादचारी पुलाचा भाग कोसळला
मुंबईतल्या सीएसएमटी स्थानकाजवळी पादचारी पुलाचा 60 टक्के भार गुरुवारी (14 मार्च) रात्री 7.20 च्या सुमारास कोसळला. या दुर्घेटनेत सहा जणांचा मृत्यू झालाय तर 31 जण जखमी झाले आहेत.
दुर्घटनेतील मृतांची नावं 1. अपूर्वा प्रभू - वय 35 वर्ष 2. रंजना तांबे - वय 40 वर्ष 3. जाहिद खान - वय 32 वर्ष 4. भक्ती शिंदे - वय 40 वर्ष 5. तपेंद्र सिंह - वय 35 वर्ष 6. मोहन कायगुंडे - वय 55 वर्ष
घटनेतील जखमींची नावं 1. सोनाली नवले 30 वर्ष 2. अध्वित नवले 3 वर्ष 3. राजेंद्र नवले 33 वर्ष 4. राजेश लोखंडे 39 वर्ष 5. तुकाराम येडगे 31 वर्ष 6. जयेश अवलानी 46 वर्ष 7. महेश शेरे 8. अजय पंडित 31 वर्ष 9. हर्षदा वाघाळे 35 वर्ष 10. विजय भागवत 42 वर्ष 11. निलेश पाटावकर 12. परशुराम पवार 13. मुंबलिक जैसवाल 14. मोहन मोझाडा 43 वर्ष 15. आयुषी रांका 30 वर्ष 16. सिराज खान 17. राम कुपरेजा 59 वर्ष 18. राजेदास दास 23 वर्ष 19. सुनील गिर्लोटकर 39 वर्ष 20. अनिकेत अनिल जाधव 19 वर्ष 21. अभिजीत माना 31 वर्ष 22. राजकुमार चावला 49 वर्ष 23. सुभेष बॅनर्जी 37 वर्ष 24. रवी लगेशेट्टी 40 वर्ष 25. नंदा विठ्ठल कदम 56 वर्ष 26. राकेश मिश्रा 40 वर्ष 27. अत्तार खान 45 वर्ष 28. सुजय माझी 28 वर्ष 29. कानुभाई सोलंखी 47 वर्ष 30. दीपक पारेक 31. अनोळखी मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. शिवाय, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकारकडून करण्यात येणार आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. एनडीआरएफची टीम मुंबईत दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या सुदुंबरे येथून एनडीआरएफची टीम मुंबईत दाखल झाली आहे. अखेर महापालिकेने जबाबदारी स्वीकारली पुलाचा भाग कोसळल्यानंतर अडीच तासांनी हा पूल मुंबई महापालिकेचाच असल्याची कबुली महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. या पादचारी पुलाच्या दुर्घटनेवरुन सुरुवातीला रेल्वे आणि महापालिका प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानली होती. रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील पूल हा रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत तर टर्मिनसला जोडणारा पूल महापालिकेच्या अंतर्गत येतो, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणं होतं. तर हा संपूर्ण पूल रेल्वेच्या हद्दीत असल्याचे महापालिकेचं म्हणणं होतं.संबंधित बातम्या
पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची एकमेकांवर टोलवाटोलवी
सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे
बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका
पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप
'तो' पूल 100 टक्के धोकादायक नव्हता, दुर्घटनेची चौकशी केली जाईल : विनोद तावडे
रेड सिग्नलमुळे अनेक जीव वाचले, सिग्नल असल्याने वाहतूक थांबली, मोठी जीवितहानी टळली