एक्स्प्लोर
मुंबईत फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंटला जलसमाधी, जीवितहानी नाही
मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंक जवळ असलेलं एआरके डेक बार हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट समुद्रात बुडालं

मुंबई : मुंबईतील समुद्रात फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंटला जलसमाधी मिळाली. सुदैवाने क्रूझवरील कामगारांना वेळीच बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंक जवळ एआरके डेक बार (MV AV IOR) हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट होतं. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास समुद्राचं पाणी क्रूझच्या आत शिरलं. हायटाईडमुळे वांद्रे जेट्टीला लागलेला अँकर निसटला आणि क्रूझ समुद्राच्या आत वाहत गेली. एका दगडाला धडकल्यामुळे क्रूझचा खालचा भाग फुटला. त्यामुळे पाणी वेगाने आत शिरायला लागलं. पाणी आत जाऊन क्रूझ एका बाजूला कलंडली. क्रूझचे कॅप्टन इरफान इस्माईल शिरगावकर यांनी 13 कामगारांना लाईफ बोटीच्या सहाय्याने सुखरुप किनाऱ्यावर आणलं. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई मॅरीटाईम आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. विक्रांत चांदवडकर, कुकी सिंग, संयुक्ता सिंग यांच्या मालकीची ती क्रूझ होती. नजीकच्या काळात अशा दुर्दैवी अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा बाळगळण्याची गरज व्यक्त होत आहे.
आणखी वाचा























