Mumbai Fire LIVE Updates: मुंबईत अग्नितांडव! ताडदेवच्या भाटिया रुग्णालयाशेजारील इमारतीला भीषण आग, वाचा अपडेट्स
Mumbai Fire LIVE Updates ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये भीषण आग लागली. या आगीत सात जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
मुंबईतील आग दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांबद्दल मी सहानुभुती व्यक्त करतो. परंतु, या दुर्घटनेतील जखमींना स्थानिक रूग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्याची माहिती मिळत आहे. याच कारणामुळे मृतांचा आकडा वाढला असल्याची माहिती आहे. हे खरं असेल तर महापालिका आणि राज्य प्रशासनाने तत्काळ याची दखल घेत कारवाई करावी. या घटनेला जे जबाबदार आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Tardeo Fire : ताडदेव भागातील इमारतीत लागलेली आग नियंत्रणात, महापौर Kishori Pednekar यांची माहिती
Mumbai Fire :कमला इमारतीतील आगीत 15 जण जखमी रिलायन्स,मसीना, वॉकहार्ट रूग्णालयावर आरोप :ABP Majha
कमला इमारतीला आग सकाळी लागली होती. आगीच कारण शोधत आहोत, 28 लोकांना बाहेर काढलं . इमारतीची फायर यंत्रणा काम करत नाही ती बंद आहे, कायदेशीर कारवाई केली जाईल . नागरिकांनी आपल्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा आहे का? हे पाहावं- - एच डी परब, अग्निशमन मुख्य अधिकारी
"आग लागलेली इमारत पूर्णपणे खाली करण्यात आलेली आहे. या आगीमध्ये दहा जण जखमी असून त्यातील काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत मधील लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरुवातीला करण्यात आलं आहे. इमारतीमधील सर्वांना बाहेर काढण्यात आलं असलं तरी या आगीमध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून आग लागलेल्या ठिकाणी आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीतून आतापर्यंत दोघांना बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.
सकाळी सातच्या दरम्यान आग लागली. आग लागल्यानंतर पूर्ण लाईट इमारतीची गेली. बाहेर पाहिलं तर मोठ्या धूर पाहायला मिळत होता आणि आग लागल्याची माहिती मिळताच सगळेजण इमारतीच्या खाली आले. प्रत्येक मजल्यावर सहा घर आहेत. या मजल्यावर आग लागली तिथे साधारणपणे 20 ते 22 रहिवासी राहात असतील. आता सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे, असं तिथल्या रहिवाशांनी सांगितलं.
आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. दरम्यान, पावणे आठच्या सुमारास ही आग लेव्हल 3 ची असल्याची अग्निशमन दलाकडून घोषणा करण्यात आली. आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सूरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही इमारत 20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असल्याची देखील माहिती मिळाली आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही इमारत 20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर या घटनेत 15 जण जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळाली आहे.
आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. दरम्यान, पावणे आठच्या सुमारास ही आग लेव्हल 3 ची असल्याची अग्निशमन दलाकडून घोषणा करण्यात आली. आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सूरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
सकाळी सातच्या दरम्यान आग लागली. आग लागल्यानंतर पूर्ण लाईट इमारतीची गेली. बाहेर पाहिलं तर मोठ्या धूर पाहायला मिळत होता आणि आग लागल्याची माहिती मिळताच सगळेजण इमारतीच्या खाली आले. प्रत्येक मजल्यावर सहा घर आहेत. या मजल्यावर आग लागली तिथे साधारणपणे 20 ते 22 रहिवासी राहात असतील. आता सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे, असं तिथल्या रहिवाशांनी सांगितलं.
इमारतीत काही लोक अडकल्याची भीती
आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून आग लागलेल्या ठिकाणी आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीतून आतापर्यंत दोघांना बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.
"आग लागलेली इमारत पूर्णपणे खाली करण्यात आलेली आहे. या आगीमध्ये दहा जण जखमी असून त्यातील काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत मधील लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरुवातीला करण्यात आलं आहे. इमारतीमधील सर्वांना बाहेर काढण्यात आलं असलं तरी या आगीमध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील टोके निलंबित; ट्राफिक विभागातील घोटाळ्याचा केला होता पर्दाफाश
- Mumbai Police : ट्राफिक पोलिसांच्या भ्रष्टाचाराविरोधात एका पोलिसाचीच हायकोर्टत जनहित याचिका
- दिवसाला विना मास्क फिरणाऱ्या 100 जणांवर कारवाई करा; पोलीस आयुक्तांचे मुंबई पोलिसांना टार्गेट
- सार्वजनिक सुट्टी मागणं हा नागरीकांचा कायदेशीर अधिकार नाही : हायकोर्ट
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -