एक्स्प्लोर

Mumbai: दिवाळीच्या काळात फटाक्यांचा जोर आणि आगीच्या घटनांचा घोर: जाणून घ्या का?

दिवाळी दरम्यान आगीच्या घटना वर्षी दरवर्षी जोमाने वाढतात पण त्यातून मुक्त होऊन फायर-फ्री सेलिब्रेशन कसे करावे? हा एक मोठा प्रश्न आहे. 

Mumbai: दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात अग्निसुरक्षा आणि अग्निशमन निर्वासन हा नेहमीच एक प्रमुख चिंतेचा विषय राहिला आहे. शहरांतील पायाभूत सुविधा, अरुंद गल्ल्या, वाहतूक, खड्डे हे अशा आगीच्या अपघातांचे एक मोठे कारण आहे. दिवाळी दरम्यान आगीच्या घटना वर्षी दरवर्षी जोमाने वाढतात पण त्यातून मुक्त होऊन फायर-फ्री सेलिब्रेशन कसे करावे? हा एक मोठा प्रश्न आहे. 

मुंबई अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळीच्या काळात आगीच्या घटनांची संख्या हि जास्त आहे. गेल्या वर्षी मुंबई अग्निशमन दलाला 65 कॉल आले होते, तर यावर्षी फायर कॉल्सची संख्या 85 अशी आहे. हे फायर कॉल्स दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांत मुंबईत नोंदवले गेले होते, त्यापैकी 37 किंवा जवळपास 44 टक्के फटाक्यांमुळे होते. खबरदारीच्या सूचना जारी करूनही मुंबईत आगीच्या अनेक घटना नोंद झाल्या. बाल्कनीतून किंवा उंच इमारतीच्या गच्चीवरती फटाके फोडण्याची एक रीत झाली आहे आणि त्यामुळे उंच इमारतींमधील अग्निसुरक्षा आणि अग्निशमन मार्गावर प्रामुख्याने प्रश्न निर्माण होतो. 

मुंबई अग्निशमन दलाने अलीकडेच म्हटल्याप्रमाणे, 2019 ते सप्टेंबर 2022 पर्यंत एकट्या मुंबईत सुमारे 15,822 फायर कॉल्स नोंद करण्यात आले आहेत. आकडेवारी दर्शवते कि गेल्या तीन वर्षांत आगीच्या घटनांमध्ये सुमारे 73 मृत्यू आणि 516 जखमी झाले. अग्निशमन दलाचे अनेक जवान जखमी झाले.  दुर्दैवाने, आपले कार्यालय किंवा घर असलेली इमारत पूर्णपणे अग्निरोधक बनवता येईल, अशी हमी जास्त किंमत मोजल्यानंतरहि कोणी देत नाही, परंतु अशा अतिउच्च इमारतींचे बांधकाम व्यावसायिक आणि आणि बिल्डर यांनी अग्निसुरक्षा प्रक्रियेला प्राधान्य देण्याचे ठरवून जर राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने दिलेल्या सल्ल्याचे पालन केले तर आगीच्या अपघातांपासून इमारत अत्यंत सुरक्षित होईल. 

आगीच्या अपघातांदरम्यान आगीतून बाहेर काढणे हा एक मोठा आणि अत्यंत तांत्रिक विषय आहे जो गंभीर असूनही भारतात चर्चित होऊ शकलेला नाही. दिवाळीच्या आगीच्या घटनांची नोंद बघता, फायर इव्हॅक्युएशन सिस्टीम व आगीच्या नियमांचे पालन किती महत्वाचे आहे ते लक्षात येते. वस्तुस्थिती लक्षात घेता अलीकडेच ऊर्जा विभागाने 2018 च्या परिपत्रकापासून पूर्वलक्षी प्रभावाने 70 मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसविण्याबाबत सल्लागार जारी केला आहे. जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी अग्निशमन अधिकाऱ्यांना उच्च मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक सुरक्षित आणि जलद मार्ग प्रदान करण्यासाठीचे हे एक दूरदर्शी पाऊल आहे. 

डॉ. विक्रम मेहता (महाराष्ट्रातील फायर इव्हॅक्युएशन मॅन म्हणून ओळखले जाणारे) म्हणतात, “फायर इव्हॅक्युएशन लिफ्टची रचना लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि आगीच्या अपघातात अग्निशमन दलाला लोकांना जलद बाहेर काढण्यात मदत करण्यासाठी केली गेली आहे. प्रत्येक उंच इमारतीमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट असणे आवश्यक आहे आणि बंधनकारक आहे. फायर इव्हॅक्युएशन लिफ्टचा वापर वाढवण्यासाठी व्यावहारिक हस्तक्षेप विकसित करून त्यांना बहु-अनुशासनात्मक दृष्टीकोन देखील स्वीकारण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे आपण लोकांचा जीव तसेच मालमत्ता वाचवू शकू.”

फायर इव्हॅक्युएशन लिफ्टची रचना IoT सारख्या प्रगत तंत्रज्ञानाने केली आहे. इमारतीमध्ये आग लागल्यास ते इमारतीच्या अग्निसुरक्षा यंत्रणा टीम/सुरक्षा टीम, लिफ्ट ऑपरेटर आणि जवळच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाला संदेश पाठवतो. इव्हॅक्युएशन लिफ्टमुळे अग्निशमन दलाला कमीतकमी वेळेत सुरक्षितपणे आग प्रभावित मजल्यापर्यंत पोहोचता येत व त्याचबरोबर सर्व वयोगटातील आणि अपंग व्यक्तीना जलद व सुरक्षितपणे काढणं शक्य आहे. पॉवर फेल झाल्यास फायर इव्हॅक्युएशन लिफ्टमध्ये 30 मिनिटांचा बॅटरी बॅकअप आहे. शहराच्या पायाभूत सुविधा, अतिवृष्टी किंवा वाहतूक कोंडी, वारा किंवा धुके यांसारखे घटक हे अग्निशमन कार्यात अडथळा आणू शकतात, ज्यामुळे लोकांना वेळेवर बाहेर काढणे हे अशक्य होते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या

भयंकर! हातात रॉकेटचा बॉक्स पेटवून फटाके फोडण्याचा जीवघेणा स्टंट; औरंगाबादेतील व्हिडिओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Football : कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
"स्वतःच्या आया, बहिणींचे व्हिडीओ जाऊन बघा, त्यांचंही शरीर माझ्यासारखंच..." 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीचा संताप
Eid Ul Fitr 2025: ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
Sikandar Box Office Collection Day 1: 'सिकंदर'समोर पुरून उरला 'छावा'; विक्की कौशलच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तर सोडा, पण कमाईसुद्धा मॅच करुन शकला नाही भाईजानंची फिल्म
'सिकंदर'समोर पुरून उरला 'छावा'; विक्की कौशलच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तर सोडा, पण कमाईसुद्धा मॅच करुन शकला नाही भाईजानंची फिल्म
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08AM TOP Headlines 08 AM 31 March 2025Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 31 March 2025ABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 07 AM 31 March 2025100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 31 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Football : कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
"स्वतःच्या आया, बहिणींचे व्हिडीओ जाऊन बघा, त्यांचंही शरीर माझ्यासारखंच..." 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीचा संताप
Eid Ul Fitr 2025: ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
Sikandar Box Office Collection Day 1: 'सिकंदर'समोर पुरून उरला 'छावा'; विक्की कौशलच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तर सोडा, पण कमाईसुद्धा मॅच करुन शकला नाही भाईजानंची फिल्म
'सिकंदर'समोर पुरून उरला 'छावा'; विक्की कौशलच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तर सोडा, पण कमाईसुद्धा मॅच करुन शकला नाही भाईजानंची फिल्म
Kisan Credit Card :किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू, शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 5 लाखांवर, नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी सुरु होणार
Maharashtra LIVE: कोल्हापुरात फुटबॉलच्या सामन्यात मैदानात फ्री-स्टाईल हाणामारी
Maharashtra LIVE: कोल्हापुरात फुटबॉलच्या सामन्यात मैदानात फ्री-स्टाईल हाणामारी
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray on Santosh Deshmukh Case: राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला येतो ऐकलं होतं, पण बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात; राज ठाकरेंचा वाल्मिक कराडवर निशाणा
राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला येतो ऐकलं होतं, पण बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात; राज ठाकरेंचा वाल्मिक कराडवर निशाणा
Embed widget