Mumbai Dream Mall Fire : ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला ओसी नव्हती!
भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत कोव्हिड रुग्णालयातील 10 जणांचा मृत्यू आतापर्यंत झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात एक महत्वाचं अपडेट समोर आलं आहे. ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला ओसी नव्हती अशी माहिती हाती आली आहे.
मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या या आगीत कोव्हिड रुग्णालयातील 10 जणांचा मृत्यू आतापर्यंत झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात एक महत्वाचं अपडेट समोर आलं आहे. ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला ओसी नव्हती अशी माहिती हाती आली आहे. 6 मे 2020 रोजी सनराईज हॉस्पिटलला कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कोविड हॉस्पिटल म्हणून तात्पुरती परवानगी देण्यात आली होती.
31 मार्च 2021 पर्यंत तात्पुरत्या परवानगीचा कालावधी संपणार होता. सनराईज हॉस्पिटल प्रशासनाची आग प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे. कुणाचा निष्काळजीपणा भोवला याचीही चौकशी होणार आहे. मार्च महिन्यात या हॉस्पिटलमधील अनियमितता आणि इतर त्रुटींकरता कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.
या रुग्णालयात 78 पेशंट होते. त्यांपैकी 6 पेशंटचा मृत्यू झाला आहे तर 72 रुग्णांना आपण इतरत्र हलवलंय, अशी माहितीही आयुक्तांनी दिली आहे. 6 पेशंटचा मृत्यु हा सध्यातरी कोविड डेथ म्हणून गणला जाणार नाही. त्यांचे मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर त्यांची नोंद होईल, असंही त्यांनी सांगितलंय.
ड्रीम मॉल शापित प्रॉपर्टी, घोटाळ्याचा महाल!
हा मॉल शापित मॉल असल्याचे देखील बोलले जात आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी मॉलचा सर्व्हे झाला होता. यात 29 मॉलमध्ये फायर यंत्रणा योग्य नसल्याचं समोर आलं होतं. यात भांडुप येथील या ड्रीम मॉलचा समावेश होता. पालिकेने या मॉलला सुद्धा नोटीस बजावली होती, अशी माहिती आहे.
Bhandup Fire | भांडुपमध्ये मॉलला लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
मॉल शापित प्रॉपर्टी
दरम्यान हा मॉल शापित प्रॉपर्टी आहे. निर्माण झाल्यापासून तो कधीच सुरू झाला नाही. एचडीआयएल ने तो बांधला आहे. आशियातील सर्वात मोठा मॉल होता. पण केसेस सुरू झाल्या आणि तो सुरूच झाला नाही. 10 ते 15 वर्ष मॉल असाच रिकामा आहे, त्यात मल्टिप्लेक्स फक्त सुरू आहे, त्यात हे हॉस्पिटल कसे सुरू झाले हा पण प्रश्न आहे. सगळ्यात जास्त अनधिकृत धंदे करणारी कार्यालयंही याच मॉलमध्ये आहेत, असं सांगितलं जात आहे.
हा मॉल म्हणजे घोटाळ्याचा महाल
भाजप नेते कीरीट सोमय्या यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर बोलताना ते म्हणाले की, हा मॉल म्हणजे घोटाळ्याचा महाल आहे. Hdil ने हा मॉल बांधला. या हॉस्पिटलला ओसी नाही, अग्निशामक यंत्रणा नाही. आज इथे मृतकांची संख्या 2 आकडी होऊ शकते. यासाठी या मॉलच्या मालकाला जबाबदार धरलं पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.