एक्स्प्लोर

मित्राच्या मिठीमुळे मुंबईतल्या डॉक्टरच्या बरगड्या मोडल्या!

मुंबई : मित्राचं प्रेम एका डॉक्टराला चांगलंच महागात पडलं आहे. मित्राने प्रेमापोटी मारलेल्या मिठीमुळे मुंबईतील एका डॉक्टरच्या तीन बरगड्या मोडल्या आहेत. डॉ. मधुकर गायकवाड असं या डॉक्टरांचं नाव आहे. ते मुंबईच्या फोर्ट भागातील सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे अधीक्षक आहेत. ही घटना 18 मार्च रोजी घडली. धुळ्यात रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ, मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी डॉ. अमित बडवे आले होते. आंदोलनात सहभागी झाल्यानंतर डॉ. बडवे यांनी डॉ. मधुकर गायकवाड यांना भेटण्याचा विचार केला. डॉ. मधुकर गायकवाड आणि डॉ. अमित बडवे यांची अनेक वर्षांनंतर भेट झाली. यावेळी डॉ. बडवे यांनी उत्साहाच्या भरात मारलेल्या मिठीमुळे डॉ. गायकवाड यांच्या तीन बरगड्या मोडल्या. या दोन्ही डॉक्टर मित्रांनी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. डॉ. बडवे यांना बॉडीबिल्डिंगची अतिशय आवड असल्याचं सगळ्यांना माहित होतं. 1990 मध्ये एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर डॉ. गायकवाड यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात नोकरी मिळाली. तर डॉक्टर बडवे यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रॅक्टिसला सुरुवात केली. कॉलेज संपल्यानंतर त्या दोघांची भेट झाली नव्हती. "मी माझ्या केबीनमध्ये होतो, तेव्हा अमित आला. त्याला पाहून मलाही आश्चर्याचा धक्का बसला. तो माझ्या दिशेने धावत आला आणि मिठी मारली. पण काय होतंय हे कळायच्या आतच माझ्या बरगड्या मोडल्या," असं डॉक्टर गायकवाड यांनी सांगितलं. यानंतर डॉ. गायकवाड जमिनीवर कोसळले. सुदैवाने ते हॉस्पिटलमध्येच असल्याने तातडीने एक्स रे केला. पहिल्या, दुसऱ्या, सातव्या बरगड्यांमध्ये फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं. बरगड्या मोडताना मला आवाज आला, असंही डॉ. गायकवाड यांनी विनोदाने सांगितलं. सुदैवाने डॉ. गायकवाड यांना झालेली दुखापत फार गंभीर नाही. त्यांना 15 दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. बरगड्यांमधील फ्रॅक्चर नैसर्गिकरित्या भरुन येईल, असंही सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
भरदिवसा रेल्वे रुळावरच महिलेला मारहाण, दादर रेल्वे स्थानकावरील धक्कादायक प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
भरदिवसा रेल्वे रुळावरच महिलेला मारहाण, दादर रेल्वे स्थानकावरील धक्कादायक प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
बाईक टॅक्सी चालकांना डोमिसाईल अनिवार्य, राज्य सरकारला प्रतिदिन 5 रुपये, राईडच्या 2 टक्के रक्कम द्यावी लागणार : प्रताप सरनाईक
मोठी बातमी,बाईक टॅक्सी चालकांना डोमिसाईल अनिवार्य, प्रताप सरनाईक यांची विधानसभेत घोषणा

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
Embed widget